उपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याहस्ते विविध विकास कामाची पायाभरणी

0
750

गोवा खबर:उपमुख्यमंत्री  मनोहर आजगांवकर यानी भाईडवाडा कोरगांव, वारखंड, हणखणे, हसापूर, शेम्याचेडवण आणि कासारवर्णे येथे  विविध विकास कामाची पायाभरणी पायाभरणी केली.

उपस्थितासमोर बोलताना उपमुख्यमंत्री श्री मनोहर आजगांवकर यानी सरकार बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी जलदगतीने कार्य करीत असल्याचे सांगितले. मोपा विमानतळ, रविंद्र भवन, आयुष इस्पितळ, क्रिकेट स्टेडियम अशा प्रकल्पांमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. विकासकामे हाती घेण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचा सल्ला त्यानी लोकाना दिला. रस्ते, संरक्षक भिंत, फूटपाथ अशी इतर कामे पूर्णत्वाच्या वाटेवर असून कांही कामे प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.

      यावेळी सरपंच श्रीमती स्वाती पार्लोसकर, श्री प्रदिप पार्लोसकर, श्री पांडुरंग पार्सेकर, श्री संतोष मळिक, श्रीमती सोनाली इब्राह्मपूरकर आणि उपसरपंच श्री कुस्तान कुयेल्हो, श्रीमती स्मिता बांदेकर, श्री शाम नाईक व लक्ष्मी नाईक उपस्थित होत्या.