पणजी:नामवंत कवी, कथाकार तसेच लेखक उदय म्हांबरे यांचे दुसरे पुस्तक तथा कविता संग्रह ‘मनशाच्या सोदांत’ शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी प्रकाशीत होत आहे. नविश्री क्रियेशन्सने आयोजित केलेला हा प्रकाशन सोहळा पाटो-पणजी येथील कला आणि संस्कृती भवनात संध्याकाळी ५.०० वाजता संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि सांस्कृतीक खात्याचे मंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहे. जेष्ठ पत्रकार संदेश प्रभूदेसाई तसेच नामवंत कवी , लॆखक आणि पत्रकार संजीव वेरेंकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता पुराणिक भट करणार आहेत.

उदय म्हांबरे यांचा यापूर्वी हय सायबा हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशीत झाला आहे. त्याला वाचकांकडून उदंड असा प्रतिसाद लाभला होता.
म्हांबरे हे मागील ३० वर्षांपासून कविता लिहीतात. एक सक्रिय लेखक म्हणून त्यांच्याकडे बघीतले जात आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्र, साप्ताहीक, पाक्षीक तसेच मासिकातून त्यांचे साहित्य प्रकाशीत झाले आहे. यात कविता, कथा, लेख यांचा समावेश आहे. आकाशवाणी तसेच दूरदर्शवरुन त्यांनी लिहीलेली रुपके सादर झाली आहेत.  श्रम एव जयते या त्यांनी लिहीलेल्या तसेच आकाशवाणीवरुन प्रसारीत करण्यात आलेल्या रुपकाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात त्यांचा सक्रियपणे सहभाग असतो. तसेच गोव्यातील पहिली चित्रपट प्रशिक्षण देणारी विन्सन अकादमी आॅफ फिल्म अ‍ॅण्ड मिडीया या संस्थेच्या कामात सुद्धा त्यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे.

नविश्री क्रियेशन्सच्या वतिने प्रकाशीत होणारे हे दुसरे पुस्तक आहे. या पूर्वी त्यांनी नामवंत साहित्यीक तथा कवी संजीव वेरेंकर यांनी लिहीलेल्या ‘हाडामासाची देवळां’ या पुस्तकाला वाचकांकडून उदंड असा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे सहा महिन्याच्या आत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या होत्या. ‘मनशाच्या सोदांत’ या कविता संग्रहाच्या आगाऊ नोंदणीसाठी वाचकांनी अभिनय क्रियेशन्सच्या अन्वेषा सिंगबाळ यांच्याशी संपर्क साधावा व सवलतीच्या दरात आपली प्रत राखून ठेवावी असे आवाहन निमंत्रक संदेश सामंत तसेच कवी उदय म्हांबरे यांनी केले आहे.