उत्तर गोव्यातून काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर यांनी सादर केला उमेदवारी अर्ज

0
663
गोवा खबर: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार,प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक,आमदार निलकंठ हळर्णकर,जेनिफर मोन्सेरात,प्रदेश महिला अध्यक्ष प्रतिमा कुतींन्हो,फ्रान्सिस सिल्वेरा आदी यावेळी उपस्थित होते.

 आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात भाजपचे आमदार फोडाफोडीचे राजकारण उघडे पाडू, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.
 ‘भाजपाने चालवलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक वैतागले आहेत. आमदार फोडून लोकांनी दिलेल्या कौलाचा भाजपा अवमान करीत आहे. भाजपाने लोकांशी संघर्षाची भूमिका घेतली असून त्यामुळे या पक्षाला आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग लोकांनी बांधला असल्याचे चोडणकर म्हणाले.
 दरम्यान, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे उद्या मंगळवारी २ रोजी सकाळी ११.३0 वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणार आहेत.