उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

0
1278
शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सचिव वंदना चव्हाण, मंदार पार्सेकर, झायगल लोबो यांच्या सोबत नव्याने पक्षात प्रवेश केलेले शिवसैनिक.
गोवाखबर:राज्यात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.तरुण कार्यकर्ते शिवसेनेकडे वळू लागले आहेत.
पणजी मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या शिवसेनेच्या सर्व साधारण बैठकीत राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या हस्ते उत्तर गोवा जिल्ह्यातील युवकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यां मध्ये पिर्ण थिवी येथील भाजप कार्यकर्ता प्रदिप खलप, म्हापसा येथील क्लीफर्ड फर्नांडिस,  हेमलता असोटिकर, शिवोली येथील विन्सेंत पेरेरा, संजय साळगांवकर आणि साळगाव येथील सायमन लोबो यांचा समावेश आहे. यावेळी राज्य सचिव मंदार पार्सेकर, वंदना चव्हाण आणि मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो हजर होते.लवकरच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.हे शिबिर ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार असल्याचे कामत यांनी कळवले आहे. तळागाळात पक्ष संघटना बांधणी मजबूत करण्याचे कार्य चालू असुन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेना लोकसभेच्या दोन्ही जागा लढविणार असून उमेदवार चाचपणी सुरु असल्याची माहिती कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.