उत्तर गोवा शिवसेनेतर्फे वर्धापन दिना निमित्त महामार्गावर वृक्षारोपण

0
610

 

 

गोवा खबर:शिवसेना उत्तर गोवा जिल्हा समितीच्या वतीने आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोंते दी गिरी महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले.

 उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, जिल्हा सरचिटणीस नंदा भाईडकर, जिल्हा सचिव मेहबूब नालबान, उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, राज्य सचिव मंदार पार्सेकर, मनोज सावंत, प्रतिक शिरोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असताना काही विपक्ष आमदारांनी असलेली माडांच्या झाडांची कत्तल थांबवावी म्हणून आंदोलन केले होते. सत्तेत आलो तर कापलेल्या झाडांच्या जागी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठी माडांची झाडे परत लावू असे आश्वासन जनतेला दिले होते पण नंतर परत निवडून येऊन मंत्रीपद मिळाल्याने त्यांना दिलेल्या शब्दांचे विस्मरण झाले असल्याची टीका जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर यांनी केली.
शिवसेननेच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त माडांचे चार रोपटे आणि रेन ट्री चे दोन रोपटे लाऊन विद्यमान भाजप सरकार आणि त्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदारांना आठवण करून दिली असून त्यांनी आणखी झाडे लावून गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन पावसकर यांनी केली आहे.
कोविड महामारीमुळे ऑक्सिजन कमतरतेमुळे झाडं लावणे किती गरजेचे आहे हे सर्वांना कळले असून यापुढे प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे मत आय टी विभाग समन्वयक प्रतिक शिरोडकर यांनी व्यक्त केले आहे. इथे शिल्लक असलेले माड खराब होऊन कुजत आहेत. सदर माडांची आणि आम्ही लावलेल्या रोपट्यांची निगा सि.एस.आर. योजनेखाली राखण्यासाठी काही कंपन्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
जिल्हा सचिव मेहबूब नालबान, राज्य सचिव मंदार पार्सेकर यांचीही भाषणे झाली.