उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक संपन्न

0
1184

 

गोवा खबर:पर्वरीतील सचिवालयात उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती अंकिता नावेलकर बैठकीस अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.

सदर बैठकीस गेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा पंचायतीसाठी ग्रास कटर आणि जनरेटर उपलब्ध करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

 उपाध्यक्ष श्री. वासुदेव कोरगांवकर,  अरूण बांधकर,  रमेश सावळ, मुख्य कार्यकारी अधिकारी  दशरथ रेडकर व इतर बैठकीस उपस्थित होते.