उत्कृष्ठ समाज सेवक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
422

 गोवा खबर:समाज कल्याण संचालनालयाने एकूण १२ समाज सेवक पुरस्कार वितरित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील गोमंतकीय समाज सेवकाकडून अर्ज मागविले आहेत. २५  हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

      पणजीतील समाज कल्याण संचालनालयाच्या काऊंटरवर विहित नमुल्यातील अर्ज मोफत उपलब्ध आहे. राजपत्रित अधिकाऱ्यानी प्रमाणित केलेले पूर्ण भरलेले अर्ज किंवा स्वंय प्रमाणित केलेले सॉफ्ट कॉपी सीडी आणि हार्ड कॉपी २२ नोव्हंबरपर्यंत समाज कल्याण संचालनालयात सादर करावे . १९ डिसेंबर २०१९ रोजी  गोवा मुक्तीदिनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

      अधिक माहितीसाठी संचालक किंवा सहाय्यक संचालकांच्या कार्यालयात ०८३२-२२३२२५७ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.