उडाण अंतर्गत इंदौर-किशनगंज विमानसेवेची सुरुवात

0
729

गोवा खबर:उडाण अंतर्गत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आठवड्यातून तीन दिवस चालणारी पहिली हवाई सेवा सुरु केली. इंदौर (मध्यप्रदेश)-किशनगंज, (अजमेर, राजस्थान) दरम्यान स्टार एअर ही विमानसेवा देणार आहे. किशनगंज-इंदौर प्रवासासाठी रस्त्याने 10 तासांहून अधिक कालावधी लागतो. मात्र विमानसेवेमुळे तासाभरात हे अंतर पार करता येणार आहे.

याखेरीज स्टार एअर बेळगावी-इंदौर दरम्यान विमानसेवा देत आहे. त्यामुळे बेळगावी किशनगंज दरम्यानचा तब्बल 1,550 किमीचा प्रवास तीन तासात करणे शक्य होणार आहे.

वेळापत्रक :-

मूळ ठिकाण जाण्याचे ठिकाण सुटण्याची वेळ पोहोचण्याची वेळ वार
बेळगावी इंदौर 13.10 14.40 सोम,मंगळ,गुरु
इंदौर बेळगावी 17.55 19.35 सोम,मंगळ,गुरु
इंदौर किशनगंज 15.00 16.05 सोम,मंगळ,गुरु
किशनगंज इंदौर 16.30 17.35 सोम,मंगळ,गुरु