उच्च दाबाने फरशी पुसणारा आणि स्वत:ची स्वच्छता करणारा मिलॅग्रोचा जगातील पहिला रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर

0
464

 

 

स्वतंत्र नेव्हिगेशन फीचर्ससह ३ नवे फ्लोअर्स रोबोट्स लाँच केले

लाँचिंगचा प्रीमियर ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइम डेमध्ये केला जाईल

 

 

गोवा खबर: देशातील पहिल्या क्रमांकाचा सर्व्हिस रोबोट ब्रँड मिलॅग्रोने,  मिलॅग्रोआयमॅप मॅक्स, मिलॅग्रो आय मॅप १०.० आणि मिलॅग्रो सीगल हे तीन नवे रोबोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. या सर्वांमध्ये मिलॅग्रोच्या मालकीचे सॉफ्टवेअर ‘RT2R’ – रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. भारतातील स्थितीच्या व्यवस्थापकीय पद्धती लक्षात घेऊन ३ वर्षे संशोधन आणि विकासासाठीचे परिश्रम घेऊन हा रोबोट तयार करण्यात आला आहे. हे रोबोट अॅमेझॉनच्या प्राइम डे सेलमध्ये ६-७ ऑगस्ट रोजी लाँच केले जातील.

मिलॅग्रोआयमॅप मॅक्स: जगातील पहिला फ्लोअर वेट मॉपिंग आणि व्हॅक्युमिंग रोबोट हा स्वत:च ४० एनच्या प्रेशरने स्वत:चा मॉप स्वच्छ करतो. हा पूर्णपणे स्वतंत्र, सेल्फ-क्लिनिंग रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर असून ओल्या मॉपद्वारे स्वच्छ करण्याचे तंत्र आहे. ते एआय अल्गोरिदमवर आधारीत असून मॉप  खाली येतो दोन हायड्रॉलिक शाफ्ट्सद्वारे फरशीवर १० एनचे प्रेशर देतो. या अतिरिक्त दाबामुळे फरशीवरील कॉफी, सॉस आदींसारखे हट्टी डाग आणि घाणही स्वच्छ केले जातात.

ठराविक भाग स्वच्छ केल्यानंतर आयमॅप मॅक्स स्वत:च्या स्वच्छतेकडे वळतो. फॅब्रिक स्वच्छ करण्यापूर्वी वॉश बेस अस्वस्छ झालेल्या मॉपवर स्वच्छ पाणी फवारतो. त्यानंतर हाय-पॉवर मोटरच्या स्क्रॅपरद्वारे,  घाण झालेल्या मॉपला पुन्हा व्हॅक्युमिंग आणि वेट मॉपिंगसाठी जाण्यापूर्वी ४० एनच्या प्रेशरद्वारे त्याला स्वच्छ केले जाते. क्लिनिंग मॅपच्या स्मृतीनुसार, ज्या जागेवरून स्वच्छतेसाठी आले, त्या ठिकाणी रोबोट पुन्हा जाऊन बसेल. रोबोट पुन्हा सेल्फ वॉशिंगला जाण्यापूर्वी एखादा भाग वाढवणे किंवा कमी करण्यासाठी अॅपमधील सेटिंग बदलता येऊ शकते. आयमॅप मॅक्समध्ये नवी स्नेल टच साइड ब्रश सुविधा वापरली आहे. याद्वारे कोपऱ्यासारख्या अवघड ठिकाणांचीही स्वच्छता होते. रोबोटमध्ये पुन्हा वापरण्यायोग्य १ लिटर डस्ट बॅग असून यूझर्स त्याला पर्यायी डिस्पोजेबल बॅगही जोडू शकतात.

मिलॅग्रोआयमॅप मॅक्समध्ये मानवरहित वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एआय टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात लिडार सेंसर्स असून यासोबत मिलॅग्रोची पेटंट रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. यामुळे वेगाने मॅपिंग आणि रिअल टाइम मध्ये मार्गाचे नियोजन करता येते. अगदी लहान खडे, बिन्स उचलण्यासाठी यात ५२०० एमएएच बॅटरी आणि २२०० पीए पॉवरफुल सक्शन आहे. आयमॅप मॅक्स हे सलग तीन वर्षांच्या अतिरिक्त संशोधनानंतर विकसित करण्यात आले आहे. या रोबोटला २ वर्षांची एकत्रित वॉरंटी आणि जॅपनीज सक्शन मोटरवर ५ वर्षांची वॉरंटी आहे.

पाण्याच्या टाकीसह मिलॅग्रोआयमॅप मॅक्सची किंमत ९९,९९० रुपये ए‌वढी आहे.

मिलॅग्रोआयमॅप १०.० –  इलेक्ट्रॉनिक वॉटर टँकसह, ३ तासांचे बॅटरी लाइफ, सर्वात शक्तीशाली २७०० पीएच्या सक्शनसह असलेला हा सेल्फ नेव्हिगेटिंग रोबोट पूर्णपणे स्वयंचलित आहे.

अत्यंत सूत्रबद्ध असलेल्या या आयमॅप १०.० मध्ये आयमॅप लिडार तंत्रज्ञान असून ते अत्यंत काटेकोर काम करते. याद्वारे ८ एमएमपर्यंतच्या अचूकतेसह १६ मि, २१६०/सेकंदाच्या रिअल टाइममध्ये वास्तविक नकाशे तयार केले जातात. तब्बल १८ सेंसर्स असलेला हा रोबोट त्याच्या मार्गाचे नियोजन वेगाने करू शकतो. तसेच यूझरच्या मोबाइल स्क्रीनवर स्वच्छ केलेला आणि उर्वरीत भाग रिअल टाइममध्ये दाखवू शकतो. अत्यंत वेगाने प्रतिक्रिया देण्यासाठी यात ऑक्टा कोअर सीपीयूची सुविधा देण्यात आली आहे.

आयसीएमआरच्या शिफारशीनुसार, आयमॅप १०.०मधील इलेक्ट्रॉनिक वॉटर टँकमध्ये सोडियम हायपोक्लोराइट १% सोल्युशन घेता येईल, अशी सुधारणा केली असून याद्वारे कोव्हिड-१९सारखे विषाणू नष्ट केले जातात. यात सुपर सायलेंट जॅपनीज ब्रशलेस सक्शन मोटर असून ती ८०० ते २७०० पीएपर्यंत ४ सक्शन लेव्हल आणि अँटीबॅक्टेरिअल मायक्रोफायबर कपड्यांसह आहे.

मिलॅग्रोआयमॅप १०.०मध्ये  एचईपीए१२सह ट्रिपल एअर फिल्टर सिस्टिम असून ते ०.१ मायक्रॉन्स (कोव्हिडचे बीजाणू ०.१६ मायक्रॉनपर्यंत असू शकतात.) पर्यंतचे ९९.५% पीएम काढू शकते व ९.३ मायक्रॉनपर्यंतचे ९९.९७% पीएम काढू शकते. यात ५२०० एमएएच बॅटरी असून तो रिअल टाइममध्ये पूर्ण सेल्फ डायग्नोसिस आणि ट्रबलशूटिंग डिस्प्ले फंक्शनसह काम करतो. यातील सक्शन मोटरला ५ वर्षांची वॉरंटी असून एकत्रित वॉरंटी २ वर्षांची आहे.

आयमॅप १०.० ची किंमत ८९.९९०/- रुपये एवढी आहे.

 

मिलॅग्रो सीगल- गायरो मॅपिंग फ्लोअर क्लिनिंग रोबोटची उंची फक्त ७.२ सेंटीमीटर एवढी आहे.

मिलॅग्रो सीगलमध्ये ओरिएंटेशन ठरवण्यासाठी ‘गायरो मॅपिंग’ तंत्रज्ञान आहे. मिलॅग्रो सिगलमध्ये फरशी स्वच्छ करतेवेळी रिअल टाइममध्ये प्रगती आणि नकाशा यूझर्सच्या डिव्हाइसवर दर्शवला जातो. घेतलेला वेळ आणखी कमी करण्यासाठी प्रत्येक भागातील रिअल टाइममधील मार्ग रोबोटद्वारे शोधले जातात.

अँटी-बॅक्टेरिया, अँटी मायक्रोबियल आणि अँटी व्हायरल (०.५ मायक्रॉन्स) प्रॉपर्टीजद्वारे मिलॅग्रो सीगल हे हॉस्पिटल आणि तत्सम वातावरणातील संसर्गगाचा प्रसार कमी करण्यास मदत करते.

हे मायक्रोफायबर  अगदी लहान, अगदी सूक्ष्मदर्शी घाण कणदेखील स्वत:कडे ओढून घेऊ शकतात. यापूर्वी सामान्य कपड्यांचे फायबर ते केवळ झाडून काढतात. रोबोट वेट क्लिनिंगची थोडी सुविधाही देऊ शकतो. यात एनआयडीईसीईसी ब्रशलेस मोटर असून यात १५०० पीए सक्शन पॉवर असून त्याद्वारे स्वच्छतेची शक्ती सर्वाधिक होऊन जाते.

सीगलमध्ये ५ वर्षांची सक्शन मोटर वॉरंटी असून २ वर्षांची एकत्रित वॉरंटी आहे.

सीगलची किंमत २०,०००/- रुपये आहे.

 

या लाँचिंगवेळी बोलताना मिलॅग्रो रोबोट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री राजीव करावाल म्हणाले, “ सध्या घर, कार्यालय, रुग्णालय, हॉटेल्स इत्यादीमध्ये साथीच्या आजारामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, हे ३ ‘व्हाइट रोबो-नाइट्स’ बनवण्यात आले आहेत. कारण स्वच्छता आणि निर्जंतूकीकरणाची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. फरशीवर दाबाने मॉपिंग करणे, त्यानंतर स्वत:च्या मॉपची स्वच्छता करणारे हे जगातील पहिले रोबोट असून यात रिअल टाइम टेरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी वापरली आहे. .याद्वारे भारतीय बाजाराला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, याची आम्हाला खात्री आहे. अॅमेझॉन प्राइम डे इव्हेंटमध्ये ६ आणि ७ ऑगस्ट रोजी सादरीकरण झाल्यावर १० दशलक्षहून अधिक रुपयांच्या विक्रीचे आमचे उद्दिष्ट आहे. ”