ईडीसीला विक्रमी 61 कोटी रूपयांचा नफा

0
931
 गोवा:ईडीसीच्या उत्पन्नात यंदा घसघशीत वाढ झाली आहे.ईडीसीला यंदा तब्बल 61 कोटी रूपयांचा नफा झाला असून ईडीसीने राबवलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांमुळे नफ्यात भरीव वाढ झाल्याचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आज बोर्ड मीटिंग नंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कुंकळ्येकर म्हणाले,ईडीसीला गेल्या वर्षी 48 कोटी रूपयांचा नफा झाला होता.यंदा त्यात भरीव वाढ होत नफा 61 कोटी झाला आहे.ईडीसीने तरुण उद्योजक तयार करण्यावर भर दिला आहे.मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत रोज 2 उद्योजक तयार होत आहेत.आतापर्यंत 7 हजारहुन अधिक युवा उद्योजक तयार झाले असून ही ईडीसीची खरी कमाई आहे.
ईडीसी आपल्या इमारतीमध्ये 45 आसनांचे इंडक्शन सेंटर उभारणार असल्याचे सांगून कुंकळ्येकर म्हणाले,जीएसटी लागू झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकाना कुठल्या अडीचणी येऊ नयेत यासाठी ईडीसीने 600 जीएसटी प्रोफेशनल्स तयार केले आहेत.त्यातील 100 जणांना सरकार आणि ईडीसीतर्फे लॅपटॉप साठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.ईडीसीतर्फे इफ्फी साठी उभारले जाणारे कन्वेंशन सेंटर जागतिक दर्जाचे असेल असा विश्वास कुंकळ्येकर यांनी व्यक्त केला. सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी 200 कोटींचे कर्ज देण्यात आले असून एकूण 880 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.