इस्रोची शुक्र मोहीम

0
999

व्हीनस मोहिमेसाठी अभ्यास पथकाने विविध पर्याय आणि संधींची माहिती सादर केली आहे. अंतराळ विज्ञानावरील सल्लागार समिती या माहितीचा आढावा घेईल. भारतीय वैज्ञानिकांना अंतराळ आधारित प्रयोगासाठी वैज्ञानिक प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोहिमेचे अंदाजपत्रक बनवले जाईल. या प्रकल्पासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय ईशान्य विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.