इम्फालमधील इतर पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोरेह येथील एकीकृत चेक पोस्टचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

0
1716

 गोवा खबर:इम्फालमधील मोरेह येथील एकीकृत चेक पोस्ट आणि अन्य पायाभूत सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन केले. दोलाईथाबी बॅरेज प्रकल्प, साओंमबंग येथे एफसीआय खाद्य भंडारण गोदाम आणि जलपुरवठा आणि पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले.

योजना, थंगलसुरुंगंद येथे इको टुरिझम कॉम्प्लेक्स तसेच विविध पाणीपुरवठा योजनांचा यामध्ये समावेश  आहे.

400 किलोवॅट क्षमतेची डबल सर्किट सिलचर-इंफाल लाइन पंतप्रधानांनी देशाला समर्पित केली.

क्रीडा प्रकल्पांसाठीचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या बैठकीला संबोधित करताना मणिपुरच्या स्वातंत्र्य सेनानींना, विशेषत: महिला स्वातंत्र्य सेनानींना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले की मणिपूरमधील मोईरंग येथे अविभाजित भारताचे पहिले अंतरिम सरकार स्थापन केले गेले. आझाद हिंद सेनेला ईशान्येकडील लोकांकडून मिळालेल्या पाठिंब्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. नवीन भारताच्या विकास गाथेत मणिपूरची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आज सुमारे 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन किंवा भूमिपूजन झाल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्यातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या साडेचार वर्षात आपण स्वतः तीस वेळा ईशान्येकडील राज्यांना भेटी दिल्याचे त्यांनी नमूद केले. ईशान्येकडील राज्यांचा विकास होत आहे आणि दशकांपासून रखडलेली कामे पूर्ण होत आहे असे त्यांनी सांगितले.

मोरेह येथील एकीकृत चेक पोस्टमुळे कस्टम क्लिअरन्स, परदेशी चलन विनिमय, इमिग्रेशन क्लिअरन्स इत्यादी सुविधा पुरविल्या जातील.

आज उद्‌घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे केंद्र सरकारची विकासाप्रतीची कटिबद्धता प्रतिबिंबित होते असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 1987 मध्ये आखणी करण्यात आलेल्या दोलाईथाबी बॅरेज प्रकल्पाला 2014 मध्ये गती प्राप्त झाली आणि आता तो पूर्ण झाला आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. केंद्र सरकारमध्ये जलद गतीने प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनाविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले कि पंतप्रधान कार्यालयातील ‘प्रगती’ प्रणाली अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रलंबित प्रकल्पांवर नियंत्रण ठेवले जात आहे. या प्रगती बैठकींमुळे आतापर्यंत 12 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांशी संबंधित समस्यांचे निराकरण झाले आहे असे त्यांनी सांगितले.

साओंमबंग येथील एफसीआय गोदामासंदर्भात डिसेंबर 2016 ला काम सुरु होऊन तो आता पूर्ण झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पाणी पुरवठा प्रकल्पांचीही कामे वेगाने होत असल्याचे ते म्हणाले.

ईशान्येकडील राज्यांना रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडले जात आहे हे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकार आणि मणिपूर राज्य सरकार सबका साथ सबका विकासाच्या माध्यमातून कार्यरत असल्याचा उल्लेख करत, राज्य सरकारच्या “चलो पहाड, चलो गाव” कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

स्वच्छ भारत, स्वच्छता आणि चंदेलच्या महत्वाकांक्षी जिल्ह्याचा विकास यासारख्या प्रगतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात मणिपूर आघाडीवर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मणिपूरच्या मॅरीकॉमचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतला क्रीडा महाशक्ती बनविण्यात ईशान्य भारताचे महत्वपूर्ण योगदान आहे. प्रशिक्षणामध्ये पारदर्शकता आणि ऍथलीट्सच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली  असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.