इफ्फीमध्ये ७२ तासांचा लघुपट चित्रपट स्पर्धेला उंदड उत्साह

0
411

 

गोवा खबर: इफ्फी २०१९ मध्ये इएसजीने मिनी मुव्ही मेनिया यावर आव्हानात्मक लघुपट चित्रपट स्पर्धा आयोजित केली आहे त्याला उंदड उत्साह लाभला. सदर स्पर्धा ही नवोदित, हौशी चित्रपटनिर्मिती करणार्‍यांना ही एक मोठी संधी आहे आणि त्यांना यासाठी ९ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संहिता लिहण्यासाठी, चित्रिकरण, एडिटिंग आणि दिलेला विषय सुर्पूद करण्यासाठी फक्त ७२ तास दिले होते. (अवधी ५ ते ८ मिनिटस) सहभागी दोन विभागात जसे राष्ट्रीय विभाग आणि गोवा विभाग नोंद करू शकता.

विशाल भरद्वाज यांचे निवडक विषय

इएसजी ने प्रतिथयश बॉलिवूड चित्रपट निर्माता श्री. विशाल भरद्वाज यांना आमंत्रित केले आहे ज्याद्वारे त्यांनी सगळ्यांनी निवडलेल्या विषयातून कुठलेही तीन विषय निवडायचे आहे. भारद्वाज यांनी निवडलेल्या विषयावर त्यांची स्वाक्षरी व सील झाल्यानंतर त्याचे प्रकटीकरण केले जाईल. पत्रकार परिषदेत संस्था निवडलेले विषय घोषित केले आणि सहभागी झालेल्यांना विविध माध्यमातून कळविले.

उंदड उत्साहामुळे आकडे मोडित आले

गोवा आणि राष्ट्रीय विभागात ३५६ आणि १०६ चित्रपटनिर्मिती करणारे संचाने नोंदणी केलेली आहे. तारखेची मुदत संपली तेव्हा राष्ट्रीय विभागात ६५ आणि गोवा विभागात ३० चित्रपटांची नोंद झाली आहे. सगळ्यात अधिक चित्रपटांची नोंद महाराष्ट्र राज्याची झाली आहे. त्यांचे २६ चित्रपट या महोत्सवात दाखल झाले आहे. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांची ६ चित्रपटांचे नोंद झाले आहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली, ओरिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातून उर्वरित नोंदी झालेल्या आहेत.

ज्यूरी पॅनल मधील चित्रपट तज्ज्ञ

मिनी मुव्ही मेनियामध्ये आलेले उत्कृष्ट चित्रपट निवडण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. हे पॅनल हे  फिल्म समुदायामधील चित्रपट तज्ज्ञ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहे याची नोंद घ्यावी. या पॅनलमध्ये लिपिका सिंग दराय, शिवाजी लोटण पाटील आणि प्रदिप नायर असे चित्रपट तज्ज्ञ आहेत.

 

इंडस्ट्री तज्ज्ञांचे मार्गदर्शन

इंडस्ट्री तज्ज्ञाने काही चित्रपट टीमसांठी एक दिवशीय मार्गदर्शीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. कार्यशाळेच्या पॅनलमध्ये नामांकित सिनेमॅटोग्राफर प्रदिप नायर (ज्युरी पॅनलचाही भाग आहे) प्रतिथयश दिग्दर्शक आणि स्क्रिनरायटर कमल स्वरूप आणि लघुपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला गोव्यातील आदित्य जांभळे यांचा समावेश आहे.

गोव्यातील चित्रपटनिर्मिती करणार्‍यांना पुरस्कार

गोव्यातील नवोदित चित्रपटनिर्मिती करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी, ईएसजीने गोव्यातील विभागामध्ये पहिले व दुसर्‍या स्थानासाठी पुरस्कार घोषित केले आहे. तर राष्ट्रीय विभागात फक्त पहिल्या स्थानासाठी पुरस्कार दिले जाईल. उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट कथानक,  उत्कृष्ट स्क्रीनप्ले, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर उत्कृष्ट एडिटर, उत्कृष्ट साऊंड रेकॉर्डिंग, उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेत्री असे पुरस्कार दिले जाईल. स्पेशल ज्युरी पुरस्कार उत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाईल. मिनी मुव्ही मेनियाचे सर्व पुरस्कार समारोह २९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न होणार.