इफ्फीमध्ये मिनी मुव्ही मानिया शार्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

0
759
 गोवा खबर: यंदाच्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या निमित्ताने गोवा मनोरजंन संस्थेने मिनी मुव्ही मानिया नावाने लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे.ही स्पर्धा गोवा राज्य आणि देश अशा दोन पातळ्यावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गोवा मनोरजंन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी आज दिली.
पणजी येथील गोवा मनोरजंन संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला गोवा मनोरजंन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई,गोवा मनोरजंन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतेजा,चित्रपट निर्माता आदित्य जांभळे आणि गोवा मनोरजंन संस्थेचे कार्यकारी सदस्य ज्ञानेश मोघे उपस्थित होते.
लघुपट स्पर्धेचा विषय 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता गोवा मनोरजंन संस्थेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.स्पर्धकांना 72 तासात 5 ते 8 मिनीटांचा लघुपट तयार करून सादर करावा लागणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 1 हजार रूपयांचा डीडी गोवा मनोरंजन संस्थेच्या नावाने काढावा लागणार आहे.वीजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरवीले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले.