इफ्फीत यंदा गोमंतकियांच्या चित्रपटांसाठी विशेष विभाग

0
953
गोवा:यंदा इफ्फीमध्ये गोमंतकिय चित्रपटांसाठी विशेष विभाग करण्यात आला आहे.गोमंतकिय चित्रपट निर्मात्यांनी बनवलेले फीचर आणि नॉन फीचर सिनेमे यंदा इफ्फी मध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.यातील फीचर फिल्म कोकणी किंवा मराठी भाषेतील असणे गरजेचे आहे.नॉन फीचर फिल्म कोकणी,मराठी,इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असली तरी चालू शकणार आहेत.1 नोव्हेंबर 2016 ते 31 ऑक्टोबेर 2017 या कालावधी मध्ये या फीचर आणि नॉन फीचर फिल्म पूर्ण झालेल्या असणे गरजेचे आहे.गोवा मनोरंजन संस्थेच्या वेबसाइटवर या साठिचे अर्ज उपलब्ध आहेत.2नोव्हेंबर ही सिनेमा सादर करण्याची शेवटची तारीख आहे.सिनेमा निवडण्यासाठी 3 सदस्यांची समिती निवडण्यात आली आहे.
 इफ्फी प्रतिनिधी नोंदणीला प्रतिसाद
डिजिटल गोवा:20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 48 व्या इफ्फीच्या प्रतिनिधी नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सांगितले.आतापर्यंत 3 हजार 74 जणांनी ऑनलाइन अर्ज सादर केले असून त्यातील 2 हजार 998 जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत.