इफ्फीतील ओपन फोरम सुरू

0
517

 

 

गोवा खबर:इफ्फीमधील खुल्या चर्चेचा मंच ‘ओपन फोरम’ आजपासून सुरू झाला. हे ओपन फोनमचे 31वे वर्ष आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाने त्याचे आयोजन केले होते. इफ्फीची 50 वर्षांची कारकिर्द आणि प्रगती हाच त्याचा विषय होता.

 

ओपन फोरमचे उद्‌घाटन महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी केले. किरण शांताराम, ए.के.बीर, अलेक्झी गोवोरूखीन, मराहन बोर्गो यांनी चर्चेत भाग घेतला.

सुरवातीला सूत्रसंचालक प्रकाश रेड्डी यांनी फेडरेशनचा इतिहास आणि परंपरा याबाबत माहिती दिली. हे फेडरेशन 1959 मध्ये सत्यजित राय यांनी स्थापन केले. आज त्यात 350 हून अधिक फिल्म सोसायटी सहभागी आहेत. ओपन फोरमची सुरूवात 1988 झाली. सिने निर्माते, संशोधक आणि लेखकांना चर्चेद्वारे एकत्र गुंफणारा हा प्रयोग होता असे ते म्हणाले.

फेडरेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी ओपन फोरमचे दिवस वाढवून ते तीनऐवजी सात करावेत अशी सूचना केली.

अलेक्झी हे रशियन निर्माते यावेळी बोलताना म्हणाले की रशियात भारतीय चित्रपट निर्मितीला 40 टक्के सवलत देण्यात येईल. रशियन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इफ्फीने मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. रशियात मोठ्या पडद्यावरील साधारणत: दिडशे चित्रपट दरवर्षी निर्मिले जातात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.