इफ्फीचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी जाहिर

0
98
गोवा खबर : 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आंतरराष्ट्रीय ज्युरी जाहीर केले असून अर्जेन्टिनाचे पाब्लो सेसर हे ज्युरी अध्यक्ष असतील. प्रसन्ना विथानेज (श्रीलंका), अबू बकर शाकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसैन (बांगलादेश) यांचा यात समावेश आहे.
ज्युरी बाबत संक्षिप्त माहिती-
पाब्लो सेसर हे अर्जेटिनाचे चित्रपट निर्माते आहेत. समीक्षकांनी नावाजलेल्या इक्विनॉक्स, द गार्डन ऑफ रोझेस, लॉस डायोसेस डी एग्वा ॲण्ड एफ्रोडाईट, द गार्डन ऑफ पर्फ्युम्स यासारख्या चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी आफ्रिकन सिनेसृष्टीमध्ये आपले योगदान दिले आहे.
प्रसन्ना विथानेज हे श्रीलंकेचे चित्रपट निर्माते असून श्रीलंकेच्या चित्रपट सृष्टीच्या तिसऱ्या पिढीच्या संस्थापकांपैकी एक मानले जातात. डेथ ऑन फुल मून डे (1997), ऑगस्ट सन (2003), फ्लॉवर्स ऑफ द स्काय (2008), विथ यु विदाउट यु (2012) यासह आठ फिचर फिल्मचे त्यांनी दिग्दर्शन केले असून अनेक प्रतिष्टीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. श्रीलंकेमध्ये त्यांचे चित्रपट व्यावसयिकदृष्ट्याही यशस्वी ठरले आहेत. याआधी त्यांनी नाट्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय लेखकांच्या नाट्यकृती अनुवादित करून त्यांची निर्मितीही केली आहे. श्रीलंकेमधल्या सेन्सोरशिप विरोधात त्यांनी लढा दिला असून चित्रपट विषयक शिक्षण देण्याचे काम केले आहे. युवा चित्रपट निर्मात्यांसाठी आणि चित्रपट प्रेमींसाठी त्यांनी उपखंडात अनेक वर्गही घेतले आहेत.
अबू बकर शाकी “ए बी’ शाकी हे इजिप्शियन- ऑस्ट्रियन लेखक आणि दिग्दर्शक आहेत. योमेद्दिन या त्यांच्या पहिल्या फिचर फिल्मची 2018 च्या कान चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. मुख्य स्पर्धा विभागात हा चित्रपट दाखवला जाईल.
रुबैयत हुसैन या  बांगलादेशच्या चित्रपट निर्मात्या, लेखिका आणि निर्मात्या आहेत. मेहेरजान, अंडर कन्स्ट्रक्शन आणि मेड इन बांगलादेश या चित्रपटांसाठी त्यांची वाखाणणी झाली.
प्रियदर्शन हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्माते आहेत. तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमधल्या 95 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मल्याळम आणि हिंदी चित्रपटांचा समावेश असून त्यांनी सहा तमिळ आणि दोन तेलगु चित्रपटही केले आहेत.