इटलीहून आलेल्या कोरोनाग्रस्त पर्यटकाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

0
505

कोविड-19 चे नवे रुग्ण आढळले

 

 गोवा खबर:इटलीहून जयपूरला आलेल्या कोरोनाग्रस्त पर्यटकाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे.

इटलीहून भारतात आलेल्या चौदा जणांना तसेच एका भारतीयाला कोरोनाची विषाणूची बाधा झाल्याचे प्राथमिक चाचणीत आढळले आहे.

दिल्लीत आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना देखील कोविड-19 ची लागण झाली आहे.

या व्यतिरिक्त तेलंगणामध्येही व्हायरल तापाचे दोन रुग्ण आढळले आहेत.