इकोटुरिझम सोसायटी ऑफ इंडिया, गोवा शाखाचे लाँच

0
897

 

पणजी: इकोटुरिझम सोसायटी ऑफ इंडियाच्या गोवा शाखेचे गोव्यात नुकत्याच
झालेल्या दोन दिवसीय इको- टरिझम कार्यशाळेत लाँच करण्यात आले. ही कार्यशाळा ईएसओआयने
गोवा टुरिझम व ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात
आली होती. यावेळेस काही प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यटन क्षेत्रातील
विविध तज्ज्ञांनी गोव्यातील इको- टुरिझमसमोर असणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली.
इको- टुरिझवर भर देणाऱ्या या कार्यशाळेत स्थानिक समाजाच्या मदतीने शाश्वत
पर्यटनाच्या निकषांचा प्रचार करत भारताला शाश्वत व जबाबदार पर्यटन स्थळ बनवण्याचा
अजेंडा राबवण्यात आला.
जीटीडीसीचे व्यवस्थापक संचालक  निखिल देसाई यांनी यावेळेस गोव्यातील शाश्वत पर्यटनाच्या
कृती योजनेविषयी विचार मांडले, तर इतर काही मान्यवरांनीही याविषयी आपले मनोगत
व्यक्त केले.  रवी सिंग, सचिव जनरल आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ, इंडिया आणि  स्टीव
बोर्जिया, इकोटुरिझम सोसायटी ऑफ इंडियाचे माननीय अध्यक्ष हे ही यावेळेस उपस्थित होते.