इंट्रानेट ऑप्टिक फायबर नेटवर्क हेच ॲानलाईन शिक्षणाचे प्रभावी माध्यम : दिगंबर कामत

0
491
गोवा खबर : गोव्यात मोबाईल टाॅवर्सच्या उभारणीने नेटवर्कचा प्रश्न सुटणार नाही. उलट महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याचे आझे पालकांवर पडणार आहे. आज गोव्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात इंट्रानेट सुविधा पोचली आहे. स्थानीक केबल ॲापरेटर हे जाळे प्रत्येक घरातील दूरदर्शन संच वा संगणकाला जोडू शकतो. गोवा ब्राॅडबॅंड नेटवर्क हेच ॲानलाईन शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे.सरकारने त्याची गंभीर दखल घ्यावी,अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
मोबाईल टाॅवरची संख्या वाढवली म्हणुन नेटवर्क सुधारु शकत नाही,असे सांगून कामत म्हणाले, तांत्रीक दृष्ट्या “दिव्याखाली अंधार” या म्हणी प्रमाणे मोबाईल टाॅवरच्या खाली योग्य नेटवर्क मिळूच शकत नाही. तसेच मोबाईल टाॅवर पासुन जसे आपण दूर जातो तसा नेटवर्कचा प्रभाव कमी होत जातो व त्यामुळे अखंडीत नेटवर्क मिळणे कठिण होते.
ॲाप्टिक फायबर केबल नटवर्क अखंडित व प्रभावी  नेटवर्क देऊ शकते. गोव्यात इंट्रानेट सुविधेचे जाळे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यानी आपण मुख्यमंत्री असताना गोव्याला भेट दिलेल्या जिबिबीएन सेवेने  जोडले आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.
सदर सेवेचा योग्य उपयोग सरकारने करणे गरजेचे असुन, त्यामुळे डिटीएच सेवेमुळे मंदित असलेल्या स्थानिक केबल ॲापरेटर्सना रोजगाराची संधी मिळेल तसेच महागडे स्मार्टफोन घेण्याचे पालकांवरचे ओझे कमी होईल. स्थानिक केबल ॲापरेटर प्रत्येक घरातील दूरदर्शन संच वा संगणकाला जोडणी देऊन ॲानलाईन शिक्षण घराघरात पोचवतील. यामुळे विद्यार्थ्यांकडुन मोबाईलचा दुरूपयोग ही  होणार नाही,असे कामत म्हणाले.
मुख्यमंत्र्यानी ताबडतोब इंट्रानेट सुविधा पुर्णपणे कार्यांवित करण्यावर भर देणे गरजेचे असुन, सरकारने मोबाईल टाॅवरपेक्षा या सुविधेलाच प्राथमिकता देणे महत्वाचे आहे,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.