इंटरग्लोब फाउंडेशन आणि सहापीडिया ह्यांच्याद्वारे गोव्यातील जीवंत वारसा आणि संस्कृतीचा शोध

0
242

 

  • माय सिटी माय हेरिटेजह्या तीन वर्षाच्या प्रकल्पामध्ये भारतीय शहरांमधील सांस्कृतिक आणि वारसासंदर्भातील क्षमतांना नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे
  • भारतातील 12 ठिकाणांवरील विविध सांस्कृतिक आणि वारसाविषयक घटकांच्या माहिती संकलनावर भर देण्यात येणार आहे व त्यामध्ये पुस्तिकांचे प्रकाशन अंतर्भूत आहे
  • पहिल्या वर्षी समाविष्ट असलेल्या अन्य ठिकाणांमध्ये अहमदाबाद, इंदोर, प्रयागराज आणि शिलाँग ह्यांचा समावेश आहे

 

 गोवा खबर: सहापीडियाद्वारे इंटरग्लोब फाउंडेशनच्या भागीदारीसह सुरू केलेल्या ‘माय सिटी, माय हेरिटेज’ प्रकल्पामध्ये भारतीय शहरांमधील सांस्कृतिक व वारसाविषयक क्षमतांचा नव्याने शोध घेण्यावर भर देण्यात येत आहे. ह्या प्रकल्पामध्ये भारतातील 12 स्थानांवरील वैविध्यपूर्ण वारसा व सांस्कॄतिक घटकांचे अन्वेषण, डॉक्युमेंटेशन व माहितीचा प्रसार अपेक्षित आहे व त्यामध्ये शहरांबद्दल पुस्तिकांचे प्रकाशनसुद्धा अंतर्भूत आहे. ह्या प्रकल्पाचा भाग म्हणून अनेक हेरिटेज वॉक्स, संग्रहालयांच्या सहली, बैठका व शालेय विद्यार्थी व सामान्य जनतेसाठी रंजक शैक्षणिक उपक्रम अशा बाबींचे आयोजन 2020 ते 2022 मध्ये केले जाणार आहे. पहिल्या वर्षी समाविष्ट असलेल्या ठिकाणांमध्ये अहमदाबाद, इंदोर, प्रयागराज, गोवा आणि शिलाँग ह्यांचा समावेश आहे.

देशाच्या दक्षिण पश्चिमेकडील कोंकण किनारी भागामध्ये असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोव्याला अरबी समुद्र, उबदार हवामान आणि जागतिक वारसा असलेले स्थापत्य मिळाले आहे व त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण बनलेले आहे. तसेच, भारतातील पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी असलेल्या गोव्यामध्ये 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीचा कायमचा परिणाम गोवन संस्कृतीवर झालेला दिसतो. माय सिटी, माय हेरिटेज प्रकल्पाचा भाग म्हणून सहापेडीयाने गोव्याच्या वास्तु वारसा, नैसर्गिक वारसा, लोक व समुदाय, सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण संस्था, साहित्य व कला अशा थीम्ससह गोव्याच्या वारसा व संस्कृतीसंदर्भातील विविध घटकांना टिपण्यासाठी राज्यातील लेखक, संशोधक व फोटोग्राफर्ससोबत भागीदारी केली आहे.

तसेच, राज्याच्या सक्रिय नागरिकांमध्ये सहभाग, समुदाय आणि प्रक्रिया मालकीच्या नवीन संबंधांना निर्माण करण्यासाठी व जुन्या संबंधांना नव्याने उजाळा देण्यासाठी वंचित समुदायांमधील मुलांसाठीचे उपक्रम आणि हेरिटेज वॉक्ससुद्धा आयोजित केले गेले. राज्यामधील आजवर दडलेल्या गुपितांचा शोध घेण्यासाठीचे मार्गदर्शक म्हणून गोव्यातील ह्या प्रकल्पाची पूर्तता ‘माय सिटी, माय हेरिटेज, माय गोवा’ ह्या पुस्तिकेमध्ये झाली व ह्यात गोव्याच्या जीवंत वारशासंदर्भात अनेक प्रसिद्ध व फार प्रसिद्ध नसलेल्या रंजक आकर्षणांना उलगडले गेले आहे.

अशा प्रकारे माय सिटी, माय हेरिटेज प्रकल्पामध्ये व्यापक युजर गटाची गरज पूर्ण होत आहे व त्यामध्ये विकलांगता असलेली मुले, आर्थिक व सामाजिक दृष्टीने वंचित पार्श्वभूमीची मुले, संस्कृतीमध्ये रस असलेले लोक, विचारवंत, हेरिटेज व्यावसायिक, पर्यटक व इतर घटकांचा समावेश आहे. एकत्रित संशोधन, डॉक्युमेंटेशन आणि मॅपिंगद्वारे युवा स्थानिक विचारवंतांमध्ये रस निर्माण करणे, क्षमता उभी करणे व संधी निर्माण करणे, हे ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

माय सिटी, माय हेरिटेज शुभारंभ कार्यक्रम हा ह्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा एक आठवडाभराचा डिजिटल सोहळा आहे. आजवर मुख्य ठिकाणी केलेले काम दाखवण्यासाठी व समोर आणण्यासाठीच नाही. तर सांस्कृतिक नेते, बिजनेसमधील लोक, शिक्षणतज्ज्ञ व नागरिक ह्यांच्यासोबत संवाद सुरू करण्यासाठीही अनेक कार्यक्रम व लक्षणीय सोशल मिडीया अभियानांचे आयोजन केले गेले आहे. ह्या शुभारंभामध्ये डिजिटल वॉक्स, सादरीकरणे, क्विझ, स्पर्धा व इतर अनेक रंजक उपक्रमांचा समावेश आहे!

सहापीडियाविषयी

सहापीडिया हे भारताची कला, संस्कृती व इतिहासाबद्दल लेख, पुस्तके, फोटो एसेज, व्हिडिओज, मुलाखती, मौखिक इतिहास, नकाशे व टाईमलाईन्स असे विविध डिजिटल कंटेंट मल्टीमीडिया प्रकारामध्ये देणारा व विशेषज्ञ अभ्यासकांचे लेखन असलेला ओपन विश्वकोष संसाधन आहे. विषयांच्या क्षेत्रांमध्ये संकल्पना व मान्यता प्रणाली, रिवाज आणि पद्धती, दृश्य व प्रदर्शनीय कला आदींचा समावेश आहे. आमच्या कामाला दिशा देणारी मूल्ये उपलब्धता, समावेशकता, सहकार्य व विश्वसनीयता ही आहेत.

सहापीडिया अनेक बाजू लक्षात घेऊन हॉस्ट केले जाते, ते वापरण्यासाठी मोफत उपलब्ध आहे व सहभाग हे मुख्य तत्त्व लक्षात घेऊन आखले गेले व विकसित केले गेले आहे. ज्ञानाचा उपक्रम म्हणून सहापीडियाचा भर भारत आणि दक्षिण आशियावर आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या- www.sahapedia.org