आसाराम बापूचे दिवस भरले; लैंगिक अत्याचार प्रकरणात जेलमध्ये सडणार

0
1058
गोवाखबर:अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार प्रकरण आसाराम बापूला चांगलेच महागात पडले आहे. जोधपूर न्यायालयाने आज याच प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तथा कथित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आपल्या शक्तिने स्वतःची सुटका देखील करून घेऊ शकला नाही. जोधपूर न्यायालयाने आज त्याला दोषी ठरवले होते. जोधपूर न्यायालयाने आसाराम याचे सहकारी सेविका शिल्पी उर्फ संजिता गुप्ता, शरदचंद्र यांनाही दोषी ठरवले होते. या दोघांनाही प्रत्येकी २०-२० वर्षाच्या कारावासाची शिक्षा जोधपूर न्यायालयाने सुनावली आहे. इतर दोघे दोषी असल्याचा निकाल जोधपूर न्यायालयाने दिला होता.
उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आसारामवर आरोप होता. या आरोपाखाली आसारामला दोषी ठरवण्यात आले. जोधपूरच्या एसी/एसटी कोर्टाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांच्या निर्णयानंतर दोषी आसाराम कोर्टातच ढसाढसा रडला. ‘‘आता मी म्‍हातारा झालोय, माझ्यावर थोडी तरी दया करा, वयाचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्या.’’ अशी याचना त्याने न्यायाधिशांना करून पाहिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
ऑगस्ट २०१३ पासून आसाराम बापू विरोधात बलात्काराचा खटला सुरु होता.त्याला दोषी ठरवल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली होती.