गोवाखबर:केंद्र सरकारच्या पश्चिम तटावरील क्रुझ पर्यटन उद्यानच्या उन्नतींसाठींच्या प्रयत्नांमुळे येणाऱ्या वर्षांमध्ये या उद्यानात शेकडो नोकऱ्या उपलब्ध होणार आहे, असे गोव्यातील अमेरिकन कॉलेज ऑफ कलिनरी ऍन्ड लेंग्वेज आर्ट्सचे संचालक परक्षित पै फोंडेकर यांनी गुरुवारी पणजी येथील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

फोंडेकर म्हणाले, गोवेकरांचा जागतिक क्रूझ पर्यटन उद्योगातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा हिस्सा आहे आणि जर गोव्यातील तरुणांना स्वयंपाक कलामध्ये त्यांचे व्यावसायिक कौशल्य सिद्ध करायचे असेल तर ते या उद्योगाकडे एक प्रमुख संभाव्य नियोक्ता म्हणून बघू शकतील कारण या उद्योगाला जागतिक स्तरावर सद्या उच्च मागणी आहे.

असा अंदाज बांधला गेला आहे कि येत्या 5 वर्षात जवळपास 950 जहाज गोव्यात दिसणार आहेत. मुंबई ते बाळीपर्यंत क्रुझसाठी प्रस्ताव मांडलेला आहे. क्रुझ बाळी, कोची व अंदमान व निकोबार बेटाजवळ थांबणार आहे.

नुकत्याच गोव्याला भेट द्यायला आलेल्या केंद्रीय मंत्री नीतीन गडकरींनी पश्चिम तटावरील क्रुझ लाइन वाढविण्याबद्दल म्हटले होते.

प्रत्येक वर्षी शेकडो गोवेकर अमेरिका आणि युरोपातील क्रुझ वाहिन्यांवर रोजगार प्राप्त करतात. क्रुझ उद्यानाला आता गोव्यात गती मिळू लागली आहे ज्यामूळे आता गोव्यातच क्रुझवर भरती होण्याची संधी मिळेल.

क्रूझ पर्यटनाशी जोडलेल्या संभाव्य रोजगार आणि व्यावसायिक संधींबद्दल बोलताना गोव्यातील अमेरिकन कॉलेज ऑफ कलिनरी ऍन्ड लेंग्वेज आर्ट्सचे संचालक परक्षित पै फोंडेकर म्हणाले, गोवेकरांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रुझ लाइनवर पसंती दिली आहे. सरासरी जगातील क्रुझलाइनवरील 30-40 टक्के काम करणाऱ्यांपैकी भारतीय आहेत. यापैकी 60 टक्के लोक गोव्यातील आहे. आशिया खंडातील क्रुझवर प्रचंड रोजगार संधी आहे.

जगातील लक्झरी क्रुझ लाइन उद्यान हा जगातील आतिथ्य उद्योगातील सर्वांत जलद वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे आणि प्रशिक्षित व कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी क्रुझ लाइन कंपन्या या स्वयंपाकासाठी भरती गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे विशेषत: गोव्याकडे पाहत आहेत. आशिया खंडात विशेषत: भारतात जोमाने वाढविण्यासाठी संभाव्य आहे. म्हणूनच विकासाला चालना देण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे.

आम्ही सध्या जागतिक आदरातिथ्य उद्योगात सर्वात पसंतीच्या रोजगार पर्यायांपैकी एक म्हणून क्रूझ लाइनर्सवर करिअर शोधत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांसाठी कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत”, असे एसीसीएलचे प्राचार्य माधव पुणेकर म्हणाले.

विद्यार्थ्यांना हवे असलेले ज्ञान, कौशल्य, दृष्टीकोन व आंतरराष्ट्रीय क्रूझ आणि पाककला उद्योगात यशस्वी व्यावसायिक कारकिर्द घडवण्यासाठी आवश्यक क्षमता प्रदान करणे हे एसीसीएलएचे मुख्य उद्दीष्ट आहे. इतर संस्थांपेक्षा, एसीसीएलए विद्यार्थ्यांना विशिष्ट नोकरी प्रोफाइल व एक अष्टपैलू अभ्यासक्रमद्वारे प्रशिक्षित करते. यामुळे विद्यार्थी त्याला ज्या स्थितीत प्रशिक्षित केले गेले आहे त्या स्थानावर कार्यरत ठेवण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सुनिश्चित करते.