आशियातल्या प्रदूषणाचा भारतीय उपखंडातल्या नैऋत्य मोसमी पावसावर होणारा परिणाम याबाबत टीआयएफआर-बीएफ(हैदराबाद)कडून अभ्यास

0
742

 

 

 

 गोवा खबर:स्थितांबरापर्यंत (पृथ्वीच्या वातावरणातला दुसरा भर) पोहोचणाऱ्या प्रदूषकांच्या अभ्यासासाठी हैदराबादमधील टाटा मूलभूत संशोधन संस्था, बलून फॅसिलिटी (टीआएफआर-बीएफ) गेली चार वर्ष, नासा आणि इस्रोच्या अनेक पेलोडसह फुगे सोडत आहे.

टीआयएफआर-बीएफने विकसित केलेला विशेष फुगा 16 जुलै 2019 ला सोडण्यात आला. 16 जुलैला केलेल्या प्रयोगानंतर अनेक गोष्टी निदर्शनाला आल्या असून त्याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.

प्रत्येक मोसमी पावसात पावसाळी ढग प्रदूषकांचे स्थितांबरापर्यंत वहन करण्यात वाहनाची भूमिका बजावतात. वर्ष 2011 मध्ये नासाच्या उपग्रह निरीक्षणातून अशा प्रकारचा थर दिसून आला. ‘या थराला ‘एशियन ट्रोपोपॉझ एरोसोल लेअर’ असे म्हटले जाते. जुलै-ऑगस्टमध्ये मोसमी पावसाच्या कालावधीत पूर्व भूमध्य समुद्र ते चीन अशा मोठ्या क्षेत्रावर त्याचे आच्छादन असल्यास हवामानावर गंभीर परिणाम होऊ शकतात’, असे मत नासाचे शास्त्रज्ञ डॉ. जीन पॉल वर्निअर यांनी म्हटले आहे.

मोसमी पावसानंतर हा थर उत्तर गोलार्धात पसरतो, अशी माहिती सीएनआरएस या फ्रान्सच्या राष्ट्रीय शास्त्रीय संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ डॉ. ग्वेनाइल बर्हतेह यांनी दिली आहे.

‘टीअएयएफआर बलून फॅसिलिटीद्वारे विशेष फुगे सोडून याचा अभ्यास केला. वातावरणाच्या अतिशीत भागात सोडण्यासाठी अत्याधुनिक प्लॅस्टिक फुगे विकसित केले. अत्यंत कमी देशांकडे ही क्षमता आहे’ असे टीआयएफआर-बीएफ समितीचे अध्यक्ष प्रा. देवेंद्र ओझा यांनी सांगितले.

‘या मोहिमांमधून भरपूर माहिती गोळा झाली आहे.’ असे राष्ट्रीय वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा (एनएआरएल)-इस्रोचे संचालक डॉ. ए.के.पात्राा यांनी सांगितले. इस्रो आणि नासा यांच्यातल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय करारांगर्तत हे करार करण्यात आले. यावर्षी नासा, एनएआरएल-इस्रो आणि सीएनआरएस-फ्रोन्स इथल्या शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने प्रगत आणि रिमोट सेन्सिंग साधनांद्वारे प्रयोग सुरू केले.

देशातल्या अनेक भागात यंदा आतापर्यंत मोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाला आहे. शास्त्रज्ञांनी गोळा केलेली माहिती स्थितांबरामध्ये प्रदूषण वहन आणि त्याचे भारतीय उपखंडातल्या पावसावर होणारे परिणाम यांच्यातील संबंध समजून घेण्यास उपयुक्त ठरतील.

अधिक माहितीसाठी

डॉ. डी.के.ओझा, अध्यक्ष, टीआयएफआर बलून फॅसिलिटी कमिटी मो. +919867206969

डॉ. एम. वेंकट रत्नम, शास्त्रज्ञ, एनएआरएल, मो. +91 7382728390

बी. सुनील कुमार, प्रमुख शास्त्रज्ञ, टीआयएफआर बलून फॅसिलिटी मो. +919441993535