आरोग्य खात्याचे लोकांना आवाहन

0
491

 गोवा खबर:दिल्लीच्या निजामुद्दीन शहरात तबलीगी जमातच्या मरकज कार्यक्रमात देशातील विविध राज्यामधील लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये कोविड-19 चे रूग्ण सापडल्या बाबत आरोग्य सेवा संचालनालयाने कळविले आहे. यासाठी आरोग्य संचालनालयाने लोकांना आवाहन केले आहे की, गोव्यामधील कोणत्याही व्यक्तींनी जर सदर कार्यक्रमात सहभाग घेतलेला असेल तर त्यांनी त्वरित आरोग्य खात्याशी संपर्क साधावा.(दूरध्वनी क्रमांक.0832-2225538/ 2421810.हेल्पलाईन क्रमांक.104) स्वत:च्या आणि जनहितार्थासाठी.