आरोग्य कर्मचार्‍यांना मडगांव रेसिडेन्सीमध्ये प्रवेशासंबंधी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचा खुलासा

0
284

 

 

गोवा खबर:दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ७ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द झालेले वृत्त “शॉकींग, दशिण गोवा जिल्हाधिकारी अजीत रॉय यांनी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना मडगांव रेसिडेन्सीमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे” या चुकीच्या बातमीचा तीव्र निषेध केला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी या वृत्ताचे खंडन करताना म्हटले आहे की दिलेली बातमी ही दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे.

 पुढे असे नमूद केले आहे की, मडगांव रेसिडेन्सीचा आरोग्य कर्मचार्‍यांकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून कधीच वापर झाला नाही. त्याऐवजी सरकारने हॉटेलमध्ये आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना २०० हून अधिक खोल्यांची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी कॉरेंटाईन सेंटर म्हणून ही सुविधा उपलब्ध असून, या सुविधा चार महिन्यांहून अधिक काळ कार्यरत आहेत,असा खुलासा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे.

आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर त्यांच्यासाठी  हॉटेलमधील खोल्यांचा त्वरित वापर करण्यात आला अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जाऊ शकते. चालू महामारी दरम्यान शासनाने आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी विविध यंत्रणांची योग्य व्यवस्था सुनिश्चित केली आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे जिल्हाधिकारी कार्यालय काटेकोरपणे पालन करीत आहे.

 दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणाले की बातमीचा अहवाल देताना तथ्य योग्यप्रकारे पडताळले नाही म्हणून असा खुलासा करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय कोविड-१९ महामारीचा सामना करण्यासाठी गुंतलेल्या लोकांना सर्व सुविधा आणि सेवा देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत.  कोविड दरम्यान कर्तव्ये पार पाडताना कोविड पॉझिटीव्ह झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांना क्वॉरंटाईन सेंटर म्हणून पणजी रेसिडेन्सी येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

 उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य कर्मचार्‍यांसाठी  राहण्याची चांगली व्यवस्थाही केली आहे असा खुलासा जिल्हाधिकारी श्री. अजीत रॉय यांनी केला आहे.