आयुष राष्ट्रीय संस्थांच्या परिषदेचे आज प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन

0
976

 

देशातील आयुष संस्थांचा शैक्षणिक दर्जा, संशोधन, रुग्णालय सुविधांमध्ये दर्जात्मक बदल आणि या संस्थांना दीपगृह संस्था म्हणून नावारुपाला आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत आयोजन केले आहे. ही परिषद 17 आणि 18 जुलै रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे होणार आहे. परिषदेच्या उदघाटन सोहळ्याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांची उपस्थिती असणार आहे. आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा हेही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत दोन दिवस विविध आरोग्य विद्यापीठांचे कुलगुरु, नामांकित संशोधन संस्थांचे संचालक, आयआयटी, डीएसटी, डीबीटी, युजीसी या संस्थांमधून सुमारे शंभर व्यावसायिक परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेदरम्यान भारतीय क्रीडा प्राधीकरण आणि आयआयटीसोबत परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

पद्मभूषण डॉ बी एम हेगडे, पद्मश्री डॉ अनिल गुप्ता, डॉ विनोद पॉल, नीती आयोग सदस्य, डॉ केतकी बापट, केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार, डॉ व्ही एम कटोच, आयसीएमआरचे माजी महासंचालक, डॉ भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे या परिषदेला संबोधित करणार आहेत.