आयुषमंत्र्यांहस्ते रोग प्रतिकार शक्ती वाढविणा-या कीटचे वितरण

0
409

 

गोवा खबर:केंद्रीय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यांनी पोलीस खात्याला आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे औषधी कीटचे वितरण केले.

      पोलीस महानिरीक्षक  जसपाल सिंग आयपीएस यांनी डीआयजी  राजेश कुमार आणि  परमदित्य आयपीएस यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयात कीट स्वीकारले.

      अतिरिक्त जिल्हाधिकारी १,  दशरथ रेडकर यांनी उत्तर गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात कीट स्वीकारले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कुमारी, आयएएस यावेळी उपस्थित होत्या.

      आयुषमंत्र्यालयाने ही औषधी कीट वितरीत केली असून त्यात हॅड सॅनिटाईझर, च्यवनप्राश, अर्सेनिकम अल्बम-३० या होमियोपॅथी गोळ्या आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा च्यवनप्राश आणि पावडर यांचा समावेश आहे.

      गोवा आयुर्वेदिक संघटनेचे सचिव डॉ. स्नेहा भागवत, आयुषचे उपसंचालक  दत्ता भट, आयुष मिशनचे राज्य कार्यक्रम व्यवस्थापक  महेश वेर्लेकर आणि शिरोडा आयुर्वेदिक महाविध्यालयाचे  खजिनदार  अभय प्रभू यावेळी उपस्थित होते.