आयुषमंत्र्यांनी सफदरजंग रुग्णालयात युनानी आणि सिद्ध केंद्रांचे  केले उद्घाटन

0
1805

 

 गोवा खबर: केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  श्रीपाद येसो नाईक यांनी शुक्रवारी  सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे ‘युनानी मेडिकल सेंटर आणि सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट’चे उद्घाटन केले.  युनानी मेडिकल सेंटरची स्थापना ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन’ (सीसीआरयूएम) ने केली आहे आणि ‘सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट’ची स्थापना ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्ध मेडिसिन’ (सीसीआरएस) ने केली आहे.

यावेळी बोलताना नाईक म्हणाले , ‘आयुष’ प्रणालीच्या औषधाच्या माध्यमातून भारत सरकार लोकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी विशेष रुचि घेत आहे. आयुष मंत्रालय ‘आयुष्मान भारत’चा एक भाग म्हणून देशभरातील 1.50 लाख आरोग्य व निरोगी केंद्रे उभारणार आहेत.

नाईक यांनी सांगितले की,केंद्र सरकारने संपूर्ण भारतभर 12,500  आयुष आरोग्य व निरोगी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी 4 हजार या वर्षासाठी सुरू करण्यात येतील.  ‘युनानी मेडिकल सेंटर आणि सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट’ देशाच्या विविध भागातून सफदरजंग रूग्णालयात येणार्‍या रूग्णांना युनानी व सिद्ध यंत्रणेद्वारे समग्र आरोग्य सेवा मिळेल.

या वेळी आयुष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव  प्रमोद कुमार पाठक म्हणाले,   आयुष मंत्रालयाला आयुष प्रणालीचा अधिकाधीक विकास व प्रसार करणार आहे राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत त्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले जात  आहे.

सफदरजंग हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील गुप्ता म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आयुष यंत्रणेला जगभरात स्वीकार्यता प्राप्त झाली आहे. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते ‘सिद्ध मेडिसिन’ आणि ‘मधुमेह मेलीटस, हायपरटेन्शन आणि लठ्ठपणा विषयी आयईसी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.