आयुषमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे सी.एस.एम.टी.- मंगळूर ट्रेनला मिळाला करमळीला थांबा

0
371

 

गोवा खबर:कोकण रेल्वेने रेल्वे क्रमांक 12133 आणि 12134 (मुंबई सी.एस.एम.टी- मंगळूर- सी.एस.एम.टी) एक्सप्रेस गाडीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर 6 मार्च-2020 पासून करमळी स्थानकावर थांबा जाहीर केला आहे. केंद्रीय आयुष  (स्वतंत्र प्रभार) आणि  संरक्षण  राज्यमंत्री श्रीपाद नाईक  यांच्या पुढाकाराने हा थांबा प्राप्त झाला आहे. सदर गाडी पकडण्यासाठी उत्तर गोव्यातील प्रवाश्यांना दक्षिण गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकात जाण्यासाठी जावे लागले, ज्यासाठी जादा खर्च आणि वेळ द्यावा लागत असे.

गेल्या आठवड्यात दिल्लीत पार पडलेल्या संसद अधिवेशनात मंत्री श्रीपाद नाईक यांनी माननीय रेल्वेमंत्री  पियूष गोयल  यांची भेट घेतली व गोमंतकीय प्रवाश्यांसाठी करमळी स्थानकावर कायमस्वरूपी थांबा देण्याची मागणी केली.  या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनीही सहमती दर्शविली असून सदर रेल्वे तीन महिने प्रायोगिकतत्वांवर चालवून पाहणी करण्यास मान्यता दिली आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे:

Timings of train no. 12133 (down)

Mumbai CSMT- Mangaluru Jn. Express

 

 

रेल्वे स्थानक

Timings of train no. 12134 (up)

Mangaluru Jn. Express – Mumbai CSMT

6:32hrs करमळी

 

19:22hrs