आयुर्वेदिक अभ्यासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, हॉलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील आयुर्वेदिक डॉक्टर भारतात दाखल,

0
679

‘आयुशक्ती आयुर्वेद’ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी गोवा येथे आयोजित केली आठवडाभराची कार्यशाळा

 गोवा खबर:प्राचीन आयुर्वेदशास्त्राला फिरून चांगले दिवस येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विविध देशांमधील आयुर्वेदिक डॉक्टर आणि कायरोप्रॅक्टिक यांनी नुकतीच आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताला भेट दिली. देशातील प्राचीन व अस्सल उपचारपद्धतीचा अभ्यास करणारी आणि गेली ३१ वर्षे जागतिक स्तरावर कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आयुशक्ती आयुर्वेद’ने उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाचे यजमानपद भूषविले. या प्रतिनिधी मंडळामध्ये जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश होता. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रीया, हॉलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील आघाडीचे डॉक्टर या आयोजनामध्ये सहभागी झाले होते. हा कार्यक्रम गोवा येथे आयोजित करण्यात आला होता.

या शिबिराची संकल्पना ही नाडीपरीक्षा आणि हर्बल फार्माकोलॉजी यांच्या मुलतत्त्वावर आधारित होती. यात सहभागी झालेल्या तज्ञ डॉक्टरांना हर्बल गार्डन्समध्ये भेट घडविण्यात आली तसेच गोवा येथील आयुशक्ती केंद्रामध्ये नाडीपरीक्षा आणि आयुर्वेदावरील प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केली गेली. त्याशिवाय स्पाइस गार्डनमध्येसुद्धा त्यांची भेट घडविली गेली आणि ‘आयुशक्ती आयुर्वेद’मधील तज्ज्ञ चमू व संशोधक यांच्याबरोबर संवादरूपी शैक्षणिक चर्चासत्रही आयोजित केले गेले. या देवाणघेवाण कार्यक्रमात विकसित देशांमधील प्रतिष्ठित संस्थांमधील साधारण १० जाणकार व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक डॉक्टर सहभागी झाले होते. सहभागी झालेल्यांना आयुर्वेद आणि त्यातील स्त्रोतऔषधी यांच्याबाबत आयुष गोवा येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.

आयुशक्ती आयुर्वेदच्या संस्थापिका आणि प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य स्मिता नरम आणि आयुशक्तीमधील डॉक्टरांची जगद्विख्यात विशेष टीम यांनी आत्तापर्यंत 108 देशांमधील 10लाख लोकांवर उपचार केले आहेत. अस्थमा, अॅलर्जी, सांधेदुखी, मधुमेह, सोरायसीस, जुन्या आजारांची लक्षणे, पाठीचे दुखणे, लठ्ठपणा, वंध्यत्व, महिलांचे आरोग्य समस्या,  दीर्घकालीन थकवा, उच्च रक्तदाब, त्वचा व केश समस्या,  एपिलेप्सी,ऑटीझ्म आयबीएस, मुलांच्या आरोग्य समस्या आणि इतरही दीर्घकालीन आरोग्य समस्या या रोगांवर संस्थेतर्फे उपचार करण्यात येतात. ‘आयुशक्ती’मधील आयुर्वेदिक वनौषधी ही अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि रशिया यासारख्या देशांमध्ये २९ वर्षे निर्यात केली जातात.

वैद्य स्मिता नरम म्हणाल्या, “जगभरातील लाखो लोकांना मदत करणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे आणि हे ध्येय जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रशिक्षणातून सध्या होवू शकते. या प्रशिक्षण सप्ताहामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रीया व नेदरलँड येथील डॉक्टर, नॅचरोपॅथ, आयुर्वेद डॉक्टर सहभागी झाले होते. ते गेली १०-१५ वर्षे आयुशक्ती आयुर्वेदशी जोडले गेलेले आहेत. आयुशक्ती आयुर्वेदमधील प्रशिक्षण हे प्रत्यक्ष दिलेले प्रशिक्षण असते आणि त्यातून नाडीपरीक्षेतील सखोल ज्ञान प्राप्त होते आणि त्यांना रुग्णांना भेडसावत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासांचे योग्य असे निदान करण्यास मदत होते.”

हेल्थ डायनॅमिक्स, ऑस्ट्रेलिया येथील या कार्यक्रमात सहभागी झालेले जो फार्मोसा यांनी या कार्यक्रमांमधील आपल्या अनुभवान बद्दल बोलताना म्हटले, “आयुशक्ती’च्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा मी गेली दहा वर्षे अवलंब करत आहे. या एक आठवड्याच्या कार्यशाळेने मला या वनौषधींचे महत्व आणि त्यातील औषधगुणांबद्दल शिकण्याची संधी दिली. त्याशिवाय नाडी परीक्षेबद्दल अधिकची माहिती आणि स्पष्टताही या कार्यशाळेतून मिळाली. मला आता माझ्या चमूला अधिक उत्तमरित्या प्रशिक्षित करता येईल आणि वनौशधींबद्दल अधिक माहिती देता येईल. एखाद्या रुग्णाच्या आरोग्यावर वनौषधींच्या माध्यमातून कसा सकारात्मक उपचार करता येतो याचे धडेही येथे मिळाले.”

न्युयॉर्कमधील नेटवर्क कायरोप्रॅक्टिक डॉक्टर स्टीफन वेसलर म्हणाले, “आयुशक्ती’च्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा मी गेली १४वर्षे अवलंब करत आहे. ‘आयुशक्ती आयुर्वेद’तर्फे आयोजित या कार्यशाळेमध्ये मला आयुर्वेदाचे शिक्षण मी आता इतरांना देऊ शकेन एवढा आत्मविश्वास मिळाला. आता मी माझ्या रुग्णांवर अधिक परिणामकारक असे आयुर्वेदिक उपचार करू शकतो.”

‘आयुशक्ती आयुर्वेद’ची जागतिक स्तरावर १०८ सल्लाकेंद्रे आहेत. ती अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे असून तेथील स्थानिक डॉक्टर हे ‘आयुशक्ती’च्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीप्रमाणे त्यांच्या रुग्णांवर उपचार करतात. दरवर्षी ‘आयुशक्ती’चे भारतातील डॉक्टर या देशांमध्ये जाऊन तेथील स्थानिक डॉक्टरांना प्रशिक्षित करतात. ‘आयुशक्ती’च्या उपकंपन्या अमेरिका, नेदरलँड येथे असून तेथे अनुभवी वैद्य प्रॅक्टिस करतात. ‘आयुशक्ती आयुर्वेदिक’कडे अग्रगण्य डॉक्टर आणि तज्ज्ञांची एक उत्तम फळी असून नाडी परीक्षेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अत्यंत परिणामकारक आणि स्थानिक पद्धतीने तयार केलेली नैसर्गिक आरोग्यसेवा आणि ‘डिटॉक्स कार्यक्रम’ हे या डॉक्टरांचे वैशिष्ट्य आहे. ‘आयुशक्ती’ वनऔषधी उपचारही देऊ करते. त्या माध्यमातून रुग्ण लवकर बरा होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याशिवाय अनेक वर्षांच्या संशोधनातून तयार झालेल्या वनौषधींचासुद्धा या उपचारांमध्ये समावेश केलेला असतो.

अलिकडच्या घडामोडींनुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष’च्या क्षेत्रामध्ये अधिक व्यावसायिक यावेत व त्यांना प्रोत्साहन मिळावे अशी योजना आखली आहे. त्यामुळे दुहेरी विकासाचे हे मॉडेल तयार होणार असून ‘आयुष’ क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल आणि भारतात आयुर्वेदाची लोकप्रियताही वाढेल. डॉक्टर स्मिता नरम म्हणाल्या, “‘आयुशक्ती आयुर्वेद’ने आयोजित केलेल्या या देवाण-घेवाण कार्यक्रमामुळे इतर देशांबरोबरचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील आणि भारतात व पाश्चिमात्य देशांमध्ये पारंपारिक औषधांची वृद्धी होण्यास मदत होईल. केंद्र सरकारने पारंपारिक भारतीय औषधांच्या बाबतीत आणि ‘आयुष’च्या बाबतीतील हाती घेतलेल्या मिशनला हातभार लावण्याचा आमचा उद्देश आहे. या प्रयत्नांमुळे आयुर्वेदाचे भारतातील महत्त्व तर वाढेलच पण त्याशिवाय पारंपारिक औषधांच्या माध्यमातून इतर देशांबरोबरचे आपले संबंधही अधिक दृढ होतील.”