आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन योस्का च्या प्रयत्नांमुळे भारतात

0
3905

 

 गोवा खबर:  फिटनेस टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या योस्का च्या प्रयत्नांमुळे आयर्न मॅन ७०.३ ट्रायथलॉन ही  शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी स्पर्धा भारतात आयोजित करणे प्रथमच शक्य होत आहे. जागतिक क्रीडाविश्वाचा एक मानबिंदू असलेली आयर्न मॅन ही  जगात सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा  आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगातल्या ५३ देशात होणा-या २३० विविध चाचण्यांमध्ये दरवर्षी ६ लाख ८० हजार हून जास्त स्पर्धक सहभागी होतात. एकाच दिवशी समुद्रात पोहणे, सायकलिंग आणि धावणे हे तीन टप्पे एकामागून एक पार करणे अशा स्वरूपाची ही स्पर्धा शारीरिक क्षमतेची सर्वात कठोर परीक्षा घेते.  

 

दीपक राज आणि रुद्रप्रसाद नान्जुदप्पा यांनी २०१६ मध्ये योस्का ची सुरुवात केली. धावणे, ट्रायथलॉन , पोहणे, सायकलिंग, चालणे अशा सर्वसाधारण फिटनेस  साठीच्या प्रयत्नांचे आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण विविध शारीरिक क्षमतेच्या लोकांना मानवेल अशा त-हेने योस्का मध्ये दिले जाते.

 

या शारीरिक क्षमतेला आव्हान देणा-या क्रीडाप्रकारांत ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्पर्धेबद्दल योस्का चे सहसंस्थापक आणि हौशी ट्रायथलॉन स्पर्धक दीपक राज म्हणाले, ” आयर्न मॅन भारतात भरवून आम्ही देशातल्या क्रीडाप्रेमींना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूही सहभागी होणार असल्यामुळे क्रीडाजगतात भारताची ओळख पक्की होईल.”
हौशी धावपटू आणि योस्का चे सह संस्थापक रुद्रप्रसाद नांजुदप्पा म्हणाले, “या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक ‘सेलिब्रिटी’ ठरेल आणि त्याच्या कामगिरीमधून प्रेरणा घेणा-या हजारो भारतीयांना फिटनेस चे महत्त्व आणखी स्पष्टपणे कळेल. ही स्पर्धा म्हणजे ‘फिट इंडिया’ या चळवळीतला आमचा अल्पसा सहभाग आहे.”
 

 

 

 

या स्पर्धेबद्दल २०१२ चे आयर्न मॅन विश्व विजेते पीट जेकब म्हणाले ” गोव्यात होणा-या ७०. ३ आयर्न मॅन चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी निवड झाली हा माझा सन्मान आहे. अनेक देशांत आयर्न मॅन चे आयोजन होत असताना आणि त्यातून तेथील लोकांना फिटनेस मध्ये रस निर्माण होताना तसेच त्यामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन अधिक चांगले होताना मी पहिले आहे.”
आयर्न मॅन मध्ये अनेकदा सहभागी झालेल्या आणि त्यांच्या वयोगटात विजयी ठरलेल्या जैमिएल जेकब भारतात होणा-या स्पर्धेच्या महिला अँबॅसेडर आहेत. “योस्का च्या प्रयत्नांनी भारतात आयर्न मॅन ट्रायथलॉन सुरु होत असताना मी त्याची साक्षीदार आहे हे माझे भाग्य समजते. या स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने भाग घेतील आणि भारतात या स्पर्धेबद्दल उत्सुकता निर्माण होईल अशी मला आशा आहे. ”
आयर्न मॕन १९७८ मधे सुरू झाली तेव्हा एकाच ठिकाणी होत असे. आता मात्र तिचा जगभरात प्रसार झाला आहे आणि ५३ देशात २३० ठिकाणी ती भरवली जाते.
आयर्न मॅन आशिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री. जॉफ मेयर म्हणाले,” भारतात आयर्न मॅन स्पर्धा होणे हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. मी आणि माझे सहकारी या स्पर्धेची सुरुवात होत असल्याबद्दल अतिशय आनंदी आहोत. या स्पर्धेत भाग घेणा-यांची संख्या झपाट्याने वाढल्याचे गेल्या काही वर्षात दिसत आहे. आयर्न मॅन ७०.३ गोवा च्या निमित्ताने भारतातल्या खेळाडूंना अगदी त्यांच्या अंगणात आल्याचा आनंद झाला असेल. भारतातल्या या पहिल्या रेस मध्ये काही चमकदार कामगिरी पाहायला मिळेल अशी आशा आहे.”
आयर्न मॅन स्पर्धा ही भाग घेणा-या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पर्यटनाची संधी असते. यामुळेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी गोव्याची झालेली निवड सुयोग्य आहे. स्पर्धा २० ऑक्टोबर 2019 ला होईल. भाग घेणा-या खेळाडूंना १.९ कि. मी. पोहायचे आहे, ९० कि. मी. सायकलिंग करायचे आहे आणि २१ कि.मी. धावायचे आहे. या तिन्ही गोष्टी एकामागून एक करायच्या आहेत. याबद्दलचा संपूर्ण तपशील www.ironman.com/goa70.3 या अधिकृत वेब साइट वर उपलब्ध आहे. आणखी माहितीसाठी कृपया www.yoska.in/IRONMAN70.3goa  या वेबसाइट ला भेट द्यावी.