आयर्नमॅन 70. 3 गोवासाठी योस्काने फास्ट अँड अप यांना न्यूट्रीशन पार्टनर म्हणून घोषित केले

0
1462
गोवा खबर:पणजी येथे 20 ऑक्टोबर 2019 रोजी होणाऱ्या भारतातील पहिल्या आयर्नमॅन 70.3 गोवा ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजक योस्का यांनी फास्ट अँड अप यांना न्यूट्रीशन पार्टनर म्हणून घोषित केले.
या उपक्रमाच्या पहिल्या भागासाठी हि स्वागतार्ह घोषणा आहे. या उपक्रमात 27 देशातील 1000 प्रतिनिधी आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जाणार आहेत.
आयर्नमॅन हा जगातील मोठ्या उपक्रमातील एक उपक्रम असून गोव्यात त्याची सुरवात होत आहे. येथे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना 1.9 किमीचे समुद्रातील पोहणे, 90 किमी सायकल चालवणे आणि 21.1 किमी पळणे हे क्रिडाप्रकार आठ आणि अर्ध्या तासात अनुक्रमे पूर्ण करायचे आहेत.
फास्ट अँड अप हा देशातील क्रिडा क्षेत्रात आवडीने घेतला जाणारा मोठ्या खेळाडूंना आवडणारा ब्रँड आहे. याची ख्याती क्रिकेटर, बॉक्सर्स, स्वीमर्स, अथलेट्स, ट्रायथलेट्स आणि इतरांच्यातही अधिक आहे.
आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांसाठी न्यूट्रिशन आणि हायड्रेशन सांभाळणे हेसुद्धा एक आव्हानच असते. आपले ध्येय गाठण्यासाठी सुनियोजित आहार आणि योग्य न्यूट्रिशनच्या म्हत्वाबाबत भारतीय ट्रायथलेट्सना संपूर्ण कल्पना असल्याची महिती आयर्नमॅन स्पर्धेला भारतात आणलेल्या बेंगलोरस्थित योस्का नावाच्या फिट टेक कंपनीचे सहसंथापक दिपक राज यांनी सांगितले.
योस्काचे सहसंस्थापक रुद्रप्रसाद नांजूडाप्पा यांनीही दिपक यांच्या मताला दुजोरा दिला. ते म्हणाले, जागतिक दर्जाचे न्यूट्रिशन फास्ट अँड अप जे अनेक ट्रायथलेट्सकडून वापरले जाते ते देशभरात सहज उपलब्ध होऊ शकते.
आयर्नमॅन 70.3 गोवाचे न्यूट्रिशन पार्टनर म्हणून ते लाभल्याने आम्हाला आनंद होतो आहे. फिट इंडिया चळवळ आणि ट्रायथलॉनमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हि भागीदारी नक्कीच काम करेल.
आयर्नमॅन 70. 3 गोवा यांच्यासोबतच्या भागीदारीबाबत बोलताना फास्ट अँड अपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराघवन वेणुगोपाल म्हणाले, आयर्नमॅन 70.3 गोवाचे न्यूट्रिशन पार्टनर म्हणून आम्हाला आनंद होतो आहे. आणि फास्ट अँड अपने सपोर्ट केलेले अनेक अथलेट्स आणि ट्रायथलेट्स या उपक्रमात सहभागी होत असल्याचा अभिमानही वाटत आहे. आयर्नमॅन 70.3 गोवाचे आयोजक योस्का आणि फास्ट अँड अप यांचे फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीला प्रमोट करणे, हे समान ध्येय आहे. आणि हे ध्येय मिळवण्यासाठी केलेल्या या भागीदारीमुळे आम्ही आनंदित आहोत।
उपक्रमाबाबतच्या अधिक माहितीसाठी www.ironman.com/goa70.3 या वेबसाईटला भेट द्या शिवाय अधिक जाणून घेण्यासाठी www.yoska.in/IRONMAN70.3goa हि वेबसाईटही मदत करेल.