आयरिश यांचे पर्रिकर यांना खुल्या चर्चेचे आव्हान

0
995

मुख्यमंत्री तथा पणजी मतदारसंघाचे भाजप उमेदवार मनोहर पर्रिकर यांच्यावर आज आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी जोरदार हल्लाबोल केला. पर्रिकर यांनी 2 दशके पणजीचे प्रतिनिधत्व करून देखील पणजीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांना आयएएस अधिकारी नेमण्याची भाषा करावी लागते ही शोकांतिका असून त्यांच्या इतका भ्रष्ट मुख्यमंत्री आणखी कोणी नसेल असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला. रॉड्रिग्ज यांनी पर्रिकर यांच्यावर गंभीर आरोप करताना पर्रिकर यांना खुले आव्हान देत जाहिर चर्चा करायची आपली तयारी असून पर्रिकर यांनी जागा आणि वेळ सांगावी असे रॉड्रिग्ज म्हणाले.
रॉड्रिग्ज यांनी 2012 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्यासाठी प्रचार करून रायबंदर मधून त्यांना मताधिक्य मिळवून दिले होते.मात्र पर्रिकर यांनी विकासाच्या बाबतीमध्ये घोर नीराशा केल्याने पोटनिवडणुकीत आपण स्वच्छ प्रतिमा असलेल्या काँग्रेस उमेदवार असलेल्या गिरीश चोडणकर यांच्यासाठी प्रचार करत असल्याकडे रॉड्रिग्ज यांनी लक्ष वेधले.पर्रिकर यांच्या बरोबरच वाळपई मधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत असलेल्या विश्वजीत राणे यांना जनता धड़ा शिकवून घरी पाठवेल असे रॉड्रिग्ज म्हणाले.रॉय नाईक यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात तरी सुद्धा तुम्ही त्यांचे समर्थन करता का,असा प्रश्न केला असता विश्वजीत राणे यांचा पराभव करायचा असेल तर दूसरा पर्याय नसल्याचे सांगत रॉय नाईक यांना निवडून आणा असे आवाहन रॉड्रिग्ज यांनी केले. यावेळी गिरीश चोडणकर,प्रतिमा कुतीन्हों,सिद्धनाथ बुयाव,जनार्दन भंडारी आदि पदाधिकारी उपस्थित होते.