आयडीएफसी बँकेची गोव्यामध्ये सेवा सुरू; ग्राहकांसाठी आणला बँकिंगचा विशेष अनुभव

0
1042

 सोयीचे बँकिंग केले उपलब्ध: बँकेकडून कर्ज घेतलेल्या पण तेथे बचत खाते नसलेल्या ग्राहकांसाठी सुलभ व
सुसज्ज मोबाइल बँकिंग अॅप
 सोपे व विनासायास बँकिंग : मोफत अमर्याद एटीएम व्यवहार, बचत खात्यातील बॅलन्स विशिष्ट मर्यादेपक्षा
कमी झाल्यास शुल्क किंवा दंड नाही
 ग्राहकांना दर्जेदार अनुभव : 4 मिनिटांत आधार-एनेबल्ड बचत खाते उघडणे, 25 लाख रुपये आयुर्विमा
कवचासह सिग्नेचर व्हिसा डेबिट कार्ड, डेबिट कार्ड हरवल्यास किंवा गैरवापर झाल्यास 7 दिवसांपर्यंत सूचित
करण्याची सुविधा
 24×7 बँकर-ऑन- कॉल: आयव्हीआर नाही, सर्व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी व रविवारीही उपलब्ध
 मुदत ठेवी: 7.5% व्याजदर
 बँकेच्या शाखांव्यतिरिक्तही अन्यत्र सुविधा उपलब्ध: इंटरऑपरेबल मायक्रोएटीएमद्वारे एकांतातील ठिकाणीही
सेवा उपलब्ध बँकेचे ग्राहक असलेल्या व नसलेल्यांना विविध सेवा; पेमेंटसाठी आयडीएफसी आधार पे मर्चंट
पॉइंट्स
गोवा: आयडीएफसी बँकेने आज पणजी शहरात मध्यवर्ती ठिकाणी स्वामी विवेकानंद मार्ग येथे
पहिली शाखा सुरू करून गोव्यामध्ये सेवा सुरू केली आहे.
ऑनलाइन बँकिंग सुविधा अगोदर उपलब्ध होती. आता, गोव्यामध्ये अद्ययावत शाखा सुरू झाल्याने
ग्राहकांना आधार-आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमार्फत, केवळ 4 मिनिटांमध्ये बचत खाते सुरू करणे
शक्य होणार आहे. बँक येथे बचत व चालू खात्यापासून रिटेल कर्जे व संपत्ती व्यवस्थापन अशा संपूर्ण सेवा
व उत्पादने देणार आहे.

कोकणामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आयडीएफसी बँकेने उचललेले हे पहिले पाऊल आहे.
आयडीएफसी बँकेच्या पणजीतील शाखेचे उद्घाटन सिद्धार्थ कुसळीअंकर, ईडीसी लि.चे अध्यक्ष, गोव्याचे
माजी आमदार व पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधी, ब्रह्मानंद साखवळकर, भारतीय फूटबॉल संघाचे माजी
कप्तान, संदीप भंडारे, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि आशुतोष खरंगटे, मंगल
अनालिटिक्स अँड रिसर्च कन्सल्टिंग प्रा. लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अशा मान्यवरांच्या
उपस्थितीत झाले.
आर्थिक क्षेत्रातून वगळलेल्या व अपुऱ्या सेवा मिळणाऱ्या व्यक्तींवर विशेष भर देऊन लोकांसाठी रिटेल
फ्रेंचाइजी निर्माण करण्याच्या बँकेच्या उद्देशाला अनुसरून गोव्यात सेवा सुरू करण्यात आली आहे व देशभर
विस्तार केला जात आहे.

गेल्या दोन वर्षांत, बँकेच्या डिजिटल सुविधांमुळे उत्पादन, चॅनल व सेवा या बाबतीत नावीन्य आले आहे.
या सर्वामुळे आयडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आकृष्ट केले जाते व त्यांना विशेष अनुभव दिला जातो आणि
हा अनुभव आता बँकेने गोव्यातील ग्राहकांसाठी आणला आहे.
आयडीएफसी बँकेचे पर्सनल बँकिंगचे प्रमुख अमित कुमार यांनी सांगितले, “पगारदार व्यक्तींपासून मर्चंट व
लहान व्यवसायांपर्यंत सर्व ग्राहक श्रेणींसाठी, तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी सर्वोत्तम बँकिंग सेवा देणे हे
आमचे उद्दिष्ट आहे. बँकिंग सुलभ करण्यासाठी, जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी व केव्हाही सेवा
उपलब्ध होण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी आमच्या डिजिटल
सुविधांमध्ये मानवी घटकही समाविष्ट आहे. गोव्यामध्ये प्रवेश केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे
आणि आमच्या इंटरऑपरेबल मायक्रोएटीएममार्फत गोव्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या लोकांना आम्ही
जास्तीत जास्त सेवा देणार आहोत,” असे कुमार म्हणाले.
आयडीएफसी बँकेचा भर सुलभता, सोय व सेवा यावर आहे. बँकेच्या डिजिटल सेवांमध्ये 4 मिनिटांमध्ये
पेपरलेस पद्धतीने खाते उघडणे, चालू खाती उघडणे, सोपे व सुसज्ज मोबाइल अॅप, सर्वांगीण प्रकारचा
अनुभव, एकात्मिक तंत्रज्ञान सोयीमुळे तातडीने कर्जे उपलब्ध, बचत व चालू खाते एकत्र आणि 24×7 बँकर-
ऑन-कॉल सेवा यांचा समावेश आहे.
आयडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डासोबत व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड, कोणत्याही एटीएममधून अमर्याद
मोफत पैसे काढणे, अमर्याद मोफत निधी हस्तांतर आणि बचत खात्यात दरमहा विशिष्ट सरासरी बॅलन्स
नसल्यास शुल्क किंवा दंड नाही अशा सुविधा दिल्या जातात. कर्जविषयक सर्व गरजा मोबाइलवर उपलब्ध
करणाऱ्या मोजक्या बँकांमध्ये ही बँकही आहे.
डेबिट कार्ड 25 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा कवच देते, कार्ड हरवल्यास किंवा गैरवापर झाल्यास
सूचित करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला जातो व वादग्रस्त व्यवहारांसाठी मर्यादित विमा कवच दिले
जाते.
आयडीएफसी बँकेचा ग्राहकवर्ग अंदाजे 24 लाख आहे आणि त्यांना 17,037 पॉइंट्स-ऑफ- प्रेझेन्स (पीओपी)
द्वारे सेवा दिली जात असून त्यामध्ये 136 शाखा, 61 एटीएम, 356 बिझनेस करस्पॉडंट शाखा, 13,070
मायक्रोएटीएम व 3,423 आधार पे मर्चंट पॉइंट्स यांचा समावेश आहे.
गोव्यामध्ये आयडीएफसी बँक तळमजला, जी-2, मिलरॉक लार मेन्झेस, स्वामी विवेकानंद मार्ग, पणजी,
गोवा 403001 येथे आहे.