आयटी व्यावसायीकांची पर्रिकरांकडून निराशा:केळेकर

0
1047

मनोहर पर्रिकर आयआयटीयन आहेत.त्यांनी आवाहन केल्यामुळे आमच्यासारखे अनेकजण आयटी क्षेत्रात भवितव्य अजमावण्यासाठी गोव्यात आलो पण पर्रिकर आमची घोर निराशा केली. आज देखील आयटी शिक्षित युवकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी पुणे,बेंगलोर किंवा परदेशात जावे लागते ही शोकांतिका आहे,असा आरोप आयटी व्यावसायीक समीर केळेकर यांनी केला.
पर्रिकर यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आयटी व्यावसायिक आणि आयटी शिक्षित तरुणांवर गोवा साडून जाण्याची वेळ येत असून हे मोठे नुकसान आहे असा आरोप काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांनी केला. आयटी व्यावसायिकांनी आयटी क्षेत्राला चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर पर्रिकर यांची साथ सोडून चोडणकर यांना निवडून द्या असे आवाहन केले.