आयटीआय अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ

0
373
गोवा खबर:कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालयाने इच्छुक उमेदवारांना आयटीआयमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी  05 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत वाढविली आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी www.goaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. त्यासाठी संचालनालयाच्या www.dsde.goa.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे.
सद्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आयटीआय मधील सर्व हेल्पडेस्क 05 सप्टेंबर 2020 पर्यंत सार्वजनिक सुट्टी तसेच रविवारीसुध्दा सर्व दिवस कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनुसार कार्यरत राहतील.
राज्यातील 13 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यास संचालनालयाचा सक्रियपणे सहभाग आहे, त्यातील १० सरकारी आयटीआय आणि 3 खाजगी आयटीआय आहेत.
गोवा सरकारने आयटीआयच्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरू केले आहेत ज्यायोगे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची कार्यक्षमता पुढे आणता येईल ज्यामध्ये व्यापार आणि आयटीआयच्या स्थान प्राधान्यांच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करणे, पडताळणी करणे, अनुपालन करणे आणि स्वयंचलित गुणवत्ता यादी निर्मितीचा समावेश आहे.
10 सरकारी आयटीआय आणि 3 खाजगी आयटीआय आहेत, गोव्यात 20 अभियांत्रिकी व्यवसाय आणि 17 नॉन-अभियांत्रिकी व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
सर्व इच्छुक उमेदवार सहाय्य / तपशीलांसाठी थेट जवळच्या आयटीआयला भेट देऊ शकतात.