आयकर खात्याकडून मिरामार समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

0
1069

 

 गोवा खबर:आयकर खात्याकडून २४ जुलै रोजी आयकर दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून आयकर खात्याने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आयकर विभाग, पणजीने आज मिरामार समुद्रकिनारा स्वच्छ केला. आयकर विभागाच्या ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ५०० मीटरचा परिसर स्वच्छ केला. यावेळी थर्माकोल, प्लास्टीक, काचेच्या बाटल्या असे वर्गीकरण करुन कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावली.

मिरामार समुद्रकिनारा स्वच्छ कार्यक्रमादरम्यान काही स्थानिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्य आयुक्त श्रीमती उषा नायर, प्रिन्सीपल कमिशनर श्रीमती आम्रपाली दास, शाहनवाज रहमान, अतिरिक्त आयुक्त श्रीमती त्वरा मिश्रा, पुष्कराज आणि भारतीय महसूल सेवेच्या ७१ व्या तुकडीचे १० परिविक्षाधीन अधिकारी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. २३ तारखेला आयकर खात्याकडून पर्वरी येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.