आयएसएल २०१७-१८साठी एफसी गोवा समवेत सहकार्य कराराची किंगफिशरची घोषणा

0
941

 

किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळख कमावलेल्या किंगफिशर प्रिमिअमने आज बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित
पत्रकार परिषदेत एफसी गोवासमवेत कराराची घोषणा केली. यंदाचे चौथे वर्ष असलेल्या आणि देशातील दहा प्रमुख फुटबॉल
संघांचा सहभाग असलेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेत एफसी गोवाचा संघ एक प्रबळ दावेदार मानला जातो. १९ नोव्हेंबर २०१७
रोजी खेळल्या गेलेल्या मोसमातील पहिल्या सामन्यात गुड टाइम्सचा पुरस्कर्ता असलेल्या किंगफिशर प्रिमिअम ब्रँडसंगे आपला
पहिला विजय नोंदवला.
गोव्यातील फुटबॉल प्रेमींना आनंद क्षण देण्याच्या उद्देशाने या कराराच्या माध्यमातून किंगफिशर फुटबॉलप्रेमींसमवेत संबंध वृद्धिंगत
करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या ब्रँडची उपस्थिती सर्वव्यापी असल्याचे स्पष्ट करणार आहे. एफसी गोव्याच्या
पाठीराख्यांची संख्या वाढतच असून या नव्या सहकार्याबाबतही या पाठीराख्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा
सहकार्यांना फुटबॉलप्रेमींना एकत्रित आणण्यात किंगफिशरही उत्सुक आहे.
याप्रसंगी युनायटेड ब्रुवरीज लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष (मार्केटिंग) श्री. गुरप्रीत सिंग म्हणाले, “देशातील सर्वच प्रमुखी क्रीडा
उपक्रमांमध्ये सहभागी होणारा ब्रँड म्हणून किंगफिशरची ओळख असून विविध खेळांसमवेत दीर्घकाळ संबंध वाढवल्याने
ग्राहकांसमवेतही संपर्क वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळत आली आहे. गोव्याला फुटबॉलचा मोठा वारसा लाभला
असून इतर कोणत्याही खेळाच्या तुलनेत गोमंतकीयांना एकत्रित करण्यात फुटबॉल नेहमीच अग्रभागी राहिला आहे. इंडियन सुपर
लीगमधील एक प्रमुख व प्रबळ संघ असलेल्या एफसी गोवासमवेत सहकार्य संबंध जोडताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
किंगफिशर ब्रँडमुळे गुड टाइम्सच्या अनुभूतीतून अधिकाधिक क्रीडाप्रेमी फुटबॉलकडे आकर्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल असा
आमचा विश्वास आहे.”
एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन म्हणाले, “प्रमुख पुरस्कर्ता म्हणून किंगफिशरसमवेत संबंध जोडताना आम्हाला आनंद होत आहे.
वर्षागणिक भारतीय फुटबॉलचे व्यावसायिक आकर्षण वाढत असून विविधतेने नटलेल्या आनंदमय गोव्याचे प्रतिबिंब झळकवण्याची
क्षमता असलेल्या किंगफिशरसारख्या वैविध्यपूर्ण ब्रँडशी सहयोग घेताना आम्ही खूप आनंदी आहोत. या सहयोगातून विविध उपक्रम
व आकर्षक पद्धतीने जगभरातील एफसी गोवाच्या पाठीराख्यांना फुटबॉलचा नवा आनंद देणे शक्य होईल असा आम्हाला विश्वास
आहे. किंगफिशर ब्रँडचे मूल्यवर्धन आणि आमच्या पाठीराख्यांना फुटबॉल खेळाचा अधिकाधिक आनंद देणे हा या बहुवर्षीय
सहयोगातून आमचा प्रयत्न राहणार आहे.”
एफसी गोवासमवतेच्या या सहकार्य कराराअंतर्गत डिजिटल तसेच प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तसेच सामना स्थळांवर ऑन-ग्राउंड
प्रसिद्धी व सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदार व सर्वंकष प्रसिद्धी अभियान किंगफिशर राबवणार आहे.