आयएफसीसीआय गुंतवणूक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 80 कंपन्यांचा सहभाग

0
610
फोटो: इंडो फ्रेंच गुंवणूक परिषेदत सहाभागी झालेल्या उभय देशातील प्रतिनिधी व आयोजकांबरोबर मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत
गोवा खबर:  इंडो फ्रेंच गुंतवणुक परिषदेतील 80 कंपन्यांच्या सहभागासह  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या 2ऱ्या  इंडो फ्रेंच गुंतवणुक परिषदेचे उदघाटन  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. 

मुंबईतील फ्रान्स कौन्सुल जनरल सोनिया बार्ब्री यांनी १०० फ्रेंच प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. गेल्या वर्षी नागपूरमध्ये या प्रकारची गुंतवणूक परिषद झाली होती  व तिला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावेळी गोव्यात ही परिषद झाली. 80 हून अधिक फ्रेंच कंपन्यांचे 140 हून अधिक प्रतिनिधी यामध्ये सामिल झाले होते. त्याशिवाय भारतातीतल राज्य व केंद्र सरकारातील वरिष्ठ अधिकारी, भारत व फ्रान्समधील खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच धोरण बनविणारे अधिकारी यावेळी उपस्थित होते. काल 8 रोजी ही परिषद झाली.
गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी फ्रेंच प्रतिनिधींचे स्वागत केले आणि गोव्यात आयटी, शिपिंग, संरक्षण अशा क्षेत्रात फ्रेंच कंपन्यांनी गुंतवणूक केल्यास राज्य सरकार त्यांना नेहमीच मदत करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.  भारत आणि फ्रान्समध्ये गेली काही वर्षांपासून संरक्षण व एरोस्पेस, शिपींग व लॉजिस्टीक्स व शाश्‍वतता व हरित शहरे अशा विविध क्षेत्रात असलेले देवाणघेवाणीचे संबंध या परिषदेने वृद्धिंगत झाले. काही नव्या योजना कार्यान्वित होण्यास मदत होईल, असे यावेळी अनेकांनी मत व्यक्त केले.
इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (आयएफसीसीआय) अध्यक्ष सुमित आनंद यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अनेक फ्रेंच कंपन्या गोव्यात संशोधन व विकास क्षेत्रात काम करीत असून या परिषदेतील उभय देशांच्या सहभागाने या कामास अधिक गती प्राप्त होईल. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना या परिषदेने मूर्त रुप मिळेल, असी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 आयएफसीसीआयचे महासंचालिका पायल कन्वर यांनी परिषदेविषयी सांगितले की,  या इंडो- फ्रेंच गुंतवणूक परिषदेत दोन्ही देशांमधील कंपन्या, सरकारी अधिकारी तसेच इतरांनी घेतलेला सहभाग हा निश्चितच आनंददायी आहे.  परिषदेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. होणार आहेत, ही खचितच आनंदाची गोष्ट आहे.  फ्रेंच कंपन्या भारतात अनेक ठिकाणी गुंतवणुकीचे प्रस्ताव घेऊन आहेत व त्यातील गोवा हे प्रमुख ठिकाण आहे. भारतातील अशा गुंतवणुक पूरक शहरांमध्ये आम्ही या प्रकारच्या परिषदा घेणार आहोत.
या परिषदेत ३० हून अधिक फ्रेंच कंपन्यांसह ३५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले हे या परिषदेचे मोठे यश आहे.  इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (आयएफसीसीआय) ही संस्था भारतीय व फ्रान्समधील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी व त्यातून उभय देशांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. विना नफा तत्वावर चालणाऱ्या या संस्थेची मुंबई, दिल्ली, चेन्नई व बंगळुरू येथे कार्यालये आहेत आणि ५५० हून अधिक भारतीय व फ्रेंच उद्योग त्यांचे सदस्य आहेत. उभय देशातील व्यापारी संबंध सुरळित रहावेत व वाढावेत यासाठी ही संस्था 1977 पासून भरीव काम करीत आहे.