आम आदमी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो आणि अ‍ॅड. सुरेल तिळवे यांची नियुक्ती

0
173
गोवा खबर : अ‍ॅड. सुरेल तिळवे आणि प्रतिमा कुतिन्हो यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची आम आदमी पक्षाच्या गोवा राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या अ‍ॅड. प्रतिमा यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत, आप मध्ये सामील झाल्या आहेत. आणि त्यांच्या मते,  आप म्हणजे गोव्याच्या राजकारणामध्ये ताज्या दमाचा आशेचा किरण आहे.
अ‍ॅड. प्रतिमा ह्या पक्षात प्रवेश केल्याच्या तारखेपासूनच  आम आदमी पार्टीच्या संघटनेच्या कामात व्यस्त आहे आणि सध्या खासकरुन केपेमधील नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी आहे.
सुरेल तिळवे हे २०११ च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून ते आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षासोबत होते. याखेरीज २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार होते. तसेच ते त्यांच्या मडकई मतदारसंघात  विविध आंदोलनात व सामाजिक मुद्द्यांवर काम करण्यात सक्रिय होते. आणि सध्या ते गोव्यातील आपचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा ‘सेव्ह म्हादई’ या आंदोलनात  सक्रिय सहभाग होता व आहे, त्यांनी ‘दुहेरी ट्रॅकिंग’चा देखील निषेध केला होता. तसेच ते मेलौळीच्या लोकांसोबत आयआयटी प्रोजेक्टचा निषेध करण्यासाठी उभे होते याशिवाय मेलौळी वाचवण्याच्या धडपडीतही ते सहभागी होते.