आम आदमी पक्षाचे 1 डिसेंबरपासून गोव्यात वीज आंदोलन

0
127
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज गोव्यात 1 डिसेंबरपासून वीज आंदोलन छेडत असल्याचे जाहिर केले. त्यासोबतच  भाजपा सरकारला गोव्यातील जनतेला दरमाहा महिना २०० यूनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे आव्हान आपने दिले आहे.
आपच्या मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आप नेते वाल्मिकी नाईक आणि निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका करत वीज खात्याच्या अपयशावर बोट ठेवले.
नेत्रावळी, काणकोण, पणजी तसेच वीज मंत्री नीलेश काब्राल यांच्या स्वतःच्या कुडचडे मध्ये देखील खंडित वीज सेवा मिळत असल्याचे नाईक यांनी लक्षात आणून दिले. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने गोवेकरांना विनाकारण इन्व्हर्टर  आदी साहित्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला.
फक्त खंडित वीज सेवाच नव्हे तर वीजेच्या दाबा मधील होणारा चढ-उतार देखील चिंतेचा विषय बनला आहे,असे सांगुन नाईक म्हणाले,  वीजेच्या दाबात सतत होणाऱ्या चढ-उतारामुळे गोव्यातील नागरिकांना वीजेवर चालणाऱ्या यंत्राच्या बिघाडांना सामोरे जावे लागत आहे. खंडित वीजसेवा व वीजे दाबा मधील चढ उतार यासोबतच वीज खात्याकडून आकारल्या जात असलेल्या वाढीव वीज बिलांमुळे जनता त्रस्त आहे.वीजेची बिले दर महिन्याला न येता एकत्रितपणे एकदम आल्याने ते भरणे देखील गोवेकरांना कठीण झाले आहे,याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.
नाईक म्हणाले, चर्चे दरम्यान काब्राल यांनी भाजप जरी ९ वर्ष सत्तेत असला तरी देखील गोवेकरांना अखंडित व सुरळीत वीज सेवा देण्यात अपयशी ठरला असल्याचे मान्य केले आहे. पुढील नऊ महिन्यात अखंडित वीज सेवा व वीजे मधील चढ उतार हे दोन प्रमुख विषय मार्गी लावण्याचा त्यांच्या आश्वासनांवर कोणीही गोवेकर विश्वास ठेवतील असे वाटत नाही.लोक भाजपच्या मागील २ टर्म मधील कारभाराला जनता पूर्णपणे कंटाळली आहे.
गोव्यातील वीज परिस्थिती पाहता दिल्लीमधील २०१३ सालच्या वीज परिस्थितीची आठवण होते, असे सांगुन म्हांबरे म्हणाले,त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पदभार स्वीकारला व अत्यंत वेगाने ही परिस्थिती बदलली. आज दिल्ली मधील जनता अखंडित वीज सेवा त्याचप्रमाणे समांतर व्होल्टेज व २४ तास विजेचा उपभोग घेत आहे.
 दिल्लीमधील जी व्यक्ती घरगुती वापरासाठी दरमहा महीना २०० यूनिट पर्यंत वीजेचा वापर करत आहे त्याला पूर्ण पणे वीज मोफत आहे. जे २०० ते ४०० यूनिट पर्यंत वीजेचा वापर करत आहेत त्यांना एकुण बिलामध्ये ५० टक्के सूट आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले, गोवेकरांनी त्यांच्या दिल्लीमधील नातेवाईक व मित्रांकडून दिल्लीमधील वीजेच्या मॉडेल बद्दल माहिती घ्यावी व गोव्यातील विजेच्या मॉडल सोबत त्याची तुलना करुन पहावी.
म्हांबरे म्हणाले, गोव्याला २४ तास अखंडित वीज सेवा हवी असून तो त्यांचा अधिकार आहे. गोवेकरांना हे मिळू शकते पण भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्यात अपयशी ठरले आहेत. गोवेकरांना मूलभूत सुविधा पुरवण्याची त्यांची इच्छाशक्तीच नाही व तसेच त्यांच्याकडे त्यासाठी लागणारे कोणते नियोजन देखील नाही.
 गोव्यातील जनतेला २४ तास अखंडीत वीज सेवा तसेच २०० यूनिट पर्यंत मोफत वीज व ४०० यूनिट पर्यंत ५० टक्के सूट देण्यात यावी,अशी आम्ही मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांच्याकडे मागणी करत आहोत. भाजप सरकारला गोवेकरांना अखंडीत वीज सेवा व वाढीव बिल यापासून मुक्ती देण्यास भाग पाडण्यासाठी आम आदमी पक्षणे वीज आंदोलन छेडले आहे,असे म्हांबरे म्हणाले.
म्हांबरे म्हणाले, आज आम्ही एक सार्वमत घेण्याचा कार्यक्रम घोषित करत आहोत. गोवेकरांना आम्ही तीन प्रश्न विचारणार आहोत.जे गोवेकरांना खंडित वीज सेवेपासून तात्काळ मुक्ती हवी आहे का,गोवेकरांना २०० यूनिट पर्यंत मोफत वीज व ४०० यूनिट पर्यंत ५० टक्के वीज दर कपात हवी आहे का, प्रमोद सावंत यांनी गोवेकरांचे ऐकावे की आपल्या हाय कमांडचे,हे असणार आहेत.
7504750475  या नंबर वर मिस कॉल देऊन आपण या जनमत संग्रहाला पाठिंबा देऊ शकता. त्यानंतर  जनमत संग्रहावर सही करण्याकरिता आपल्याला एक लिंक पाठवली जाईल,असे सांगुन म्हांबरे म्हणाले, हा जनमत संग्रह घेण्याचा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यां द्वारे बाजारपेठेत त्याचप्रमाणे डोर टू डोर कार्यक्रम घेऊन  राबवला जाणार आहे. आम्ही यासाठी २०० कोपरा बैठका  देखील घेणार आहोत.