आम आदमी पक्षाचे २ नेते शिवसेनेत दाखल

0
879
गोवाखबर:आम आदमी पक्षाचे नेते आणि २०१७ विधानसभा निवडणुकीचे साखळी मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद गावस आणि डिचोलीचे उमेदवार साईनाथ पटेकर यांनी शुक्रवारी, सेना भवन मुंबई येथे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
 गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत आणि गोवा राज्य प्रमुख जितेश कामत प्रामुख्याने हजर होते. गोव्यात पक्ष बळकट करण्याचे काम जोरात चालू असुन सुशिक्षित आणि तडफदार तरूण उस्फूर्तपणे शिवसेनेत प्रवेश घेत आहेत आणि येणार्‍या काळात सामाजिक आणि राजकीय शेत्रात सक्रीय असणारे बरेच युवक युवती शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती राज्य प्रमुख जितेश कामत यांनी दिली आहे. मिलिंद गावस यांना २० वर्षांचा राजकीय अनुभव असुन त्यांच्याकडे पक्षातर्फे महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांच्या कडे खाण बंदीचा विषय मांडण्यात आला असून गोव्यातील जनतेवर होणार असणार्‍या दुष्परिणाम टाळण्यासाठी चर्चा करण्यात आली. राऊत यांनी हा विषय गंभीरपणे घेतला आहे. यासंदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले,  दिल्लीतील एका नामांकीत वकिलांशी याबाबत चर्चा झालेली आहे. पुढील पाऊल लवकरच उचलले जाईल. गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत, मिलिंद बो-हाडे, गोवा राज्यप्रमूख जितेश कामत, राज्य प्रवक्ता सौ. राखी प्रभुदेसाई नाईक, मिलिंद गावस, साईनाथ पटेकर, अमोल प्रभुगावकर यांनी सेना भवन मुंबई येथे खाणीबाबत झालेल्या चर्चेत भाग घेतला.