आमच्या बाळाची ओळख मिर्झा-मलिक अशी असेल:सानिया

0
2190

गोवाखबर:आम्हाला मूल झाल तर त्याची ओळख मिर्झा-मलिक अशीच असणार आहे.सानिया मिर्झा ही माझी स्वतंत्र ओळख आहे.लग्ना नंतर देखील मी माझ नाव बदललेल नाही.मी माझ्या आई वडीलांच नाव पुढे चालवत आहे. माझ आणि नवऱ्याच(शोएब मलिक) याबाबतीत एकमत झाल आहे.शोएबला छानशी मुलगी हवी आहे, प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हीने आज बांबोळी येथील ग्रैंड हयात हॉटेल मध्ये आयोजित गोवा फेस्ट मधील नॉलेज सीरीज मध्ये आपल्या आयुष्यातील खास गोष्टी उलगडून सांगितल्या.
सानियाने आपल्या जीवनप्रवासात घडलेल्या अनेक घटनांना उजाळा दिला. सानिया म्हणाली,आम्ही दोघी बहिणी असताना देखील आमच्या आई वडीलांना कधीच अस वाटल नाही की त्यांना आणखी एखादा मूलगा असावा.त्यांनी आम्हाला मुलींसारख वागवल. आम्हाला देखील कधी एखादा भाऊ असावा अस वाटल नाही.
वयाच्या 6 व्या वर्षी टेनिस रॅकेट हाती घेऊन स्ट्रगल करत पुढे गेली त्यामुळे आज इथपर्यंत पोचले याकडे सानियाने लक्ष वेधले.
आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्व दिले जात असले तरी अलिकडच्या काळात चित्र बदलले आहे.आता इतर खेळांना देखील महत्व मिळू लागले असे सांगून सानिया म्हणाली,आज महिला क्रीडापटूंनी देखील आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवली आहे.आज 10 ते 12 नाव महिला क्रीडा विश्वात आदराने घेतली जातात.माझ्या सुरूवातीच्या काळात फक्त पीटी उषा हीच एकमेव महिला क्रीडापटू नावारूपास आली होती.
आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना सानिया म्हणाली,आपण हैदराबादची असल्याने आपल्याला हैदराबादी बिर्याणी खुप आवड़ते. मात्र मला कुठलच जेवण बनवता येत नाही.जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा कुर्ता पायजमा घालून टीव्ही बघत बसणे आपल्याला खुप आवडते.आपण एक नंबरची आळशी असल्याचे तीने कबूल केले. सानिया म्हणाली मी कुठे फिरायला गेले की एक तर मसाज करून घेते किंवा झोपुन राहते.त्यामुळे आपल्या सोबत येणारे नेहमी वैतागलेले असतात.
अक्षय कुमारची आपण खुप मोठी फॅन आहे.मोहरा पासून मी त्याची चाहती असल्याचे सांगताना अलिकडच्या काळात जुडवा 2 हा सिनेमा बघितल्याचे तीने सांगितले.
टेनिस प्लेयर नसते तर इंटेरियल डिझायनर व्हायला आवडल असत अस सानिया म्हणाली.दुबई मधील घरी आपण आपली इंटेरियल डिझायनिंगची हौस भागवली असल्याचे ती म्हणाली.महिला आणि पुरुष टेनिस खेळाडूंची मेहनत,कसब सगळ काही सेम असताना पुरुषांना आणि महिला खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनामध्ये असलेल्या तफावती बद्दल सानियाने नाराजी व्यक्त केली. कपडयांवरुन टिका करणाऱ्यांनी कामगिरी बघावी असा सल्ला देखील तीने दिला. देशात आज क्रीडा वाहिन्या वाढत आहेत.वर्तमानपत्रां मध्ये देखील क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांबद्दल येणारे कव्हरेज वाढत असल्याबद्दल सानियाने समाधान व्यक्त केले.