आप युवा आघाडीने गोवा माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाला साथीच्या रोगाच्या अनुषंगाने परीक्षा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले

0
206
गोवा खबर : आम आदमी पार्टीने गोव्यात विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा संदर्भात व कोविडची वाढती परिस्थिती पाहता त्या रद्द करण्याचासंदर्भात  सूचना विद्यार्थ्यी व पालकांकडून मागवण्यासाठी एका फोन नंबरची घोषणा केली.
‘आप’ने म्हटले आहे की, त्यांना पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून याद्वारे हजारो प्रतिसाद मिळाले. विशेषत: सीबीएसई, सीआयएसईने संपूर्ण भारतभर परीक्षा स्थगित केल्या आहेत आणि शेजारील राज्यात महाराष्ट्रानेही त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीच्या वतीने आज एसएससी (दहावी) व एचएसएससी (बारावी)च्या परीक्षा अन्य राज्यांप्रमाणेच पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले.
आज सकाळी ‘आप’ युवा आघाडीचे नेते निखिल हळदणकर आणि रितेश शेनाई यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी निवेदन देण्यासाठी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला भेट दिली.  आपच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्ज या देखील यावेळी उपस्थित होते.
तथापि, मंडळाचे चेअरमन भागीरथ शेट्ये कार्यालयात हजर नव्हते आणि विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी  सार्वजनिक केलेला फोन नंबर मागविला असता, तसेच समोरून फोनवर उत्तर देण्यात आले नाही.  त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले निवेदन चेअरमन यांच्या कार्यालयाकडे सादर केले आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात असताना त्यांना अटक करण्यात आली व त्यांना पंजिमहून पेडणे पोलिस ठाण्यात नेले गेले. तेथे त्यांना साडेतीन वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते, व तेथे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केली गेली नाही.
गोवा बोर्ड कोविडमुळे फक्त दोन विद्यार्थ्यांना चेअरमन कार्यालयात जाण्यास सांगत होता आणि त्यामुळे रितेश शेनाई संतप्त झाले होते आणि ते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते की, शेकडो विद्यार्थ्यांना एकाच वेळी शाळेच्या आवारात त्यांच्या परीक्षेला कसे बसता  येईल ?
निखिल हळदणकर यांना प्रश्न पडला की, परीक्षेच्या दरम्यान जर व्हायरसचा संसर्ग विद्यार्थ्यांना झाला तर विद्यार्थ्याचे भवितव्य काय असेल ? आणि उर्वरित पेपरची परीक्षा तो कसा देऊ शकेल? आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यासाठी सरकारला जबाबदार धरले जाईल का?
चेअरमन कार्यालयाला पाठविलेल्या निवेदनामध्ये आप युवा आघाडीने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरासारखेच सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत अशी मागणी केली.
आप गोवाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी पेडणे पोलिस ठाण्यात अटक केलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांची सुटका केली.  आप गोव्याचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर दुपारी साडेतीन वाजता विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.