आप कोणाचीही बी टीम नाही:गोम्स

0
710
गोवा खबर: सोशल मीडिया वरुन आम आदमी पार्टीही भाजपची बी टीम असल्याचा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. आम आदमी पक्ष ही कोणत्याही पक्षाची बी टीम असल्याचे कोणीही सिद्ध केल्यास आम्ही लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार मागे घेतो,असे आव्हान आपचे समन्वयक तथा दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी आज दिले.
 काँग्रेस पक्ष हा खोट्या बातम्या पसरवण्याचा कारखाना असल्याचा आरोप आम आदमी पक्षातर्फे आज पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी आतापर्यंत राजकारण केलेले असून लोक त्यांना कंटाळले आहेत.भाजप देखील आप वर काँग्रेसची बी टीम म्हणून आरोप करत आहे.आप वरील आरोप सिद्ध करा आम्ही लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकी मधून उमेदवार मागे घेतो असे आव्हान आप नेते एल्विस गोम्स यांनी यावेळी विरोधकांना दिले.
यावेळी काँग्रेसने राज्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यास कशी मदत केली याची उदाहरणे गोम्स यांनी दिली.दहा वर्षात 13 मुख्यमंत्री पाहण्याची वेळ काँग्रेसमुळे गोव्यावर आली असा आरोप उत्तर गोव्याचे उमेदवार प्रदीप पाडगावकर यांनी यावेळी केला.चर्च संस्थेची आपल्याला साथ असून काही घटक विरोधात असले तरी आपण त्यांना माफ करतो,असे गोम्स यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
यावेळी वाल्मीकि नाईक उपस्थित होते.