आप कार्यकर्त्यांकडून जीएमसीमध्ये १७ हजारहून अधिक अन्न पॅकेटचे वितरण : राहुल म्हांबरे

0
262
गोवा खबर : आम आदमी पक्षाने, आपल्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच आठवड्यांत गोव्यातील तीन मोठ्या कोविड रुग्णालयात १७ हजारहून अधिक अन्न पॅकेटचे वितरण केल्याची माहिती दिली आहे.
राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, मे च्या पहिल्या आठवड्यात लॉकडाउन बंदी लागू झाल्यानंतर मोफत अन्न वितरण मोहीम सुरू झाली आणि चक्रीवादळ, पाऊस आणि वीज पुरवठा खंडीत झाल्या नंतर देखील कोणताही व्यत्यय न आणता दररोज ती सुरू ठेवली गेली.
लॉकडाउन प्रतिबंधामुळे हॉटेल किंवा अन्न वितरण सेवा बंद असल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना तीव्र त्रास झाला आहे याची माहिती देताना म्हंबरे म्हणाले की, आपच्या कार्यकर्त्यांनी तीन रुग्णालयांमध्ये ज्यात की सर्वात जास्त रुग्णांना दाखल करण्यात आले होते, अश्या ठिकाणी आपली सेवा प्रदान केली.यात मापुसा मधील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव मधील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि बांबोली मधील जीएमसी रुग्णालय यांचा समावेश होता.
म्हांबरे यांनी माहिती दिली की, कार्यकर्ते केवळ रूग्णाच्या नातेवाईकांनाच नव्हे तर परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि स्वच्छता कर्मचार्‍यांनाही अन्न पॅकेट देत आहेत. म्हांबरे म्हणाले की, रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत जेव्हा रुग्ण संख्या नियंत्रणाबाहेर जात होती त्यावेळी ही मदत पुरविली गेली,ज्याचे अनेक डॉक्टरांनी कौतुक केले.
पहिल्या दिवसापासून आमचे सहकारी गोयंकरांची सेवा करण्यासाठी पुढे येत असल्याबद्दल आपच्या कार्यकर्त्यांबद्दल अभिमान व कौतुक व्यक्त करताना म्हांबरे यांनी अन्न वितरण मोहीम शक्य करून दाखवणासाठी मदत करणाऱ्या सर्व समर्थक व हितचिंतकांचेही आभार मानले.