आप कडून कवळे पंचायतीला ऑक्सिमीटर प्रदान

0
243
गोवा खबर : आम आदमी पक्षाच्या फोंडा शाखेतर्फे कवळे पंचायतीला 10 ऑक्सिमीटर देण्यात आले. कवळे पंचायत क्षेत्रामध्ये ऑक्सिजन तपासणी मोहीम आपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच राबविली होती. 

आप चे युवा नेते ऍड. सुरेल तिळवे यावेळी बोलताना म्हणाले, गोवन्स अगेन्स्ट कोरोना हा गोवेकरांचा गोवेकरांसाठी राबवलेला उपक्रम आहे. गोवेकरांना आधार व पाठिंबा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कवळे भागामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता त्यांना ऑक्सिमीटरची तातडीने गरज होती. कवळे येथील रहिवाशांची सेवा करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी सरपंच राजेश कवळेकर यांचा नेहमीच आभारी राहणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सुरेल तिळवे यांनी सरपंच राजेश कवळेकर यांना ऑक्सिमीटर यंत्रे प्रदान केली. यावेळी आपचे सदस्य ब्रह्मानंद नाईक आणि भानुदास नाईक उपस्थित होते.
यावेळी सरपंच कवळेकर म्हणाले, मी दुसऱ्या राजकीय पक्षाशी निगडित असलो तरीही सध्या पक्षीय राजकारणच्या वर येऊन एकत्र येऊन हात मिळवून कोरोनाविरुद्धचा लढा सशक्त करणे गरजेचे आहे. आपने माझ्या विनंतीला प्रतिसाद देऊन गोवेकरांना या कठीण काळात मदत करण्याच्याप्रति आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे .
कवळेकर पुढे म्हणाले, या ऑक्सिमीटरमुळे विषाणूच्या विरोधातील लढ्यात यांना मदत होणार असून अशा प्रकारच्या स्रोतांची उणीव त्यांना बरीच जाणवत होती. ऑक्सिमित्रांच्या एका टीमने स्थानिक लोकांच्या चाचणीसाठी घरा – घरात जाऊन भेट दिली व कोरोना चाचणी केली. या चाचण्यांवेळी बघायला मिळालेली चांगली गोष्ट म्हणजे लोकांनी आपले आशीर्वाद दिले आणि उपक्रमाला पाठिंबा दर्शवीला.
आम्ही सरकारला या गोष्टीचीही आठवण करून देऊ इच्छितो की सरकारने गोवेकर जनतेला ऑक्सिमीटर देण्याचे वचन दिलेले आहे, ज्याची पूर्तता अजून व्हायची आहे. ज्या वेगाने कोविड ची प्रकरणे गोव्यात वाढत आहेत, ते पाहता सरकारने फार उशीर होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करायला हवी, असेही तिळवे यांनी नमूद केले.