आप आमदार आतिशी यांची नावेली पंचायतीस भेट

0
601
गोवा खबर:दिल्लीतील आपच्या आमदार श्रीमती आतिशी यांनी गोवा भेटीत नावेली पंचायतीला भेट दिली. राज्यातील या तळागाळ्यातील लोकसंस्थेचे कामकाज कसे चालते, याची माहिती त्यांनी यावेळी करून घेतली. त्यांच्याबरोबर आपचे निमंत्रक एल्विस गोम्स व इतर पक्ष सदस्य होते.
नावेली पंचायतीच्या सरपंच बेबिंदा गोन्साल्वीस व उपसरपंच पावलो परेरा यांनी त्यांचे स्वागत केले आणि नावेली पंचायतीची विविध कार्ये तसेच पंचायत कायद्याखाली ग्रामपंचायतींना असलेले अधिकार यांची माहिती त्यांना दिली. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘स्वराज्य’ म्हणजे लोकांचे राज्य. त्यांचा आवाज या संकल्पनेवर आधारित राज्यव्यवस्था यावर आपचा विश्‍वास आहे. पंचायतीच्या बाजूलाच असलेल्या आरोग्य केंद्राचे त्यांनी यावेळी उदाहरण देताना सांगितले की, इथे डॉक्टर व नर्सेस आहेत. जर तेच आले नाहीत तर लोक आरोग्य संचालकांकडे ते का आले नाहीत हे विचारण्यासाठी जाणार का. ही प्राथमिक आरोग्य केंद्रे पंचायत संचालनालयाखाली दिले तर त्यावर वचक राहील व व्यवस्थाही नीट होईल. आपने केलेले प्रयोग हे अशा विचाराने केले आहेत. त्यामुळेच आपने दिल्लीत तळागाळातील संस्थांना महत्व दिले आहे व तो प्रयोग यशस्वी झाला.
यावेळी आपचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी माहिती दिली की, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपच्या २१ उमेदवारांचे अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहेत.