आपने राजदीप नाईक यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला

0
137
गोवा खबर : सरकारवर टीका केल्याबद्दल गोंयकर कलाकार राजदीप नाईक यांच्यावरील हल्ल्याचा आप गोवाने आज निषेध केला. ‘आप’ला हे धक्कादायक वाटले आहे की भाजपचे गुंड गोव्याच्या कलाकारांवर हल्ला करतील. कारण गोंयकरांना या कठीण काळात आनंदी ठेवण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना सरकारबाबत आपले मत मांडले म्हणून त्यांच्यावर हल्ला केला. सरकारवर टीका करणे आता गुन्हा आहे काय? तसेच इतर गोयंकरांप्रमाणेच कलाकारांवरही सर्व देशभर असलेल्या साथीच्या रोगामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला.
गोयंकर कलाकार म्हणजे ते लोक, जे आपली संस्कृती जिवंत ठेवतात, त्यांची काळजी घेणे हे सरकारचे काम नाही का? सावंत सरकार त्यांच्यावर टीका करणाऱ्यांविरोधात हल्ला करण्यासाठी भाजप समर्थक गुंडांना का पाठवत आहेत?
काल राजदीप नाईक यांनी गोव्यातील भाजपा सरकारने गोव्याच्या कलाकारांसाठी मदत म्हणून 10000 रुपये ची एक रकमी सेटलमेंट योजनेच्या आपल्या मतासह एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत नाईक यांनी अशी मागणी केली होती की, सरकारने कलावंतांसाठी एक वेळची आर्थिक मदत म्हणून जाहीर केलेली 10000 रुपयेची योजना मोडीत काढावी, कारण हा कलाकारांचा अपमान आहे. ते म्हणाले की, मार्च 2020 पासून कलाकार बेरोजगार आहेत आणि त्यांना आधार देण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
नृत्यांगना, टेट्रिस्ट, संगीतकार, चित्रकार आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणारे सर्व लोक या वर्तमानकाळात आयुष्यातील वाईट काळ जगत आहेत आणि ते सर्व नियमित करदाता आहेत.
शासनाने मदत देत असताना त्यांना फक्त एक वेळ मदत देण्याऐवजी शाश्वत मदत करण्याचा विचार का केला नाही? कॅमेरामन, ध्वनी व दिवे अभियंता, मेकअप आर्टिस्ट यासारखे संघर्ष करणारे पडद्या मागील विविध कलाकार कार्यरत आहेत आणि गोवा सरकारने राज्याच्या गोवन संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी खरोखर प्रयत्नशील अशा पडद्यामागील कलाकारांचा विचारही केला नाही. गोव्याचे कलाकार आपली संस्कृती आणि आपली राज्य ओळख टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत आहेत जे की आज राज्य सरकारने जतन करणे विसरुन गेली आहे.
तालीगाव मधील आप नेत्या सेसील रॉड्रिग्जचे यांनी त्यांच्याशी सहमती दर्शविली आणि त्या म्हणाल्या की, “मी गोवा भाजपा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारू इच्छिते की, 10,000 रूपयाची रक्कम आपल्या कलाकारांसाठी पुरेसे आहेत का? सरकारने त्यांच्यासाठी आवश्यक त्या व्यवस्थेबद्दल विचार केला पाहिजे, त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन मदतीद्वारे स्थिर नोकरी शोधण्याची व्यवस्था करावी. कोविडच्या या काळात एक रकमी मदत पुरेशी आहे का? “
“भाजप सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेला हा अपमान आणि उपहास गोवन कलाकार विसरणार नाहीत.” रॉड्रिग्ज म्हणाल्या.